पुलवामामध्ये (Pulwama) पोलिसांनी दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. लष्कर-ए-तैयब (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी संघटनेशी संबंधित सहा मदतनीसांना पोलिसांनी (Police) अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, 'प्राथमिक तपासात आरोपींना रसद पुरवणे, आश्रय देणे आणि तरुणांना दहशतवादी बनवणे यामध्ये ते गुंतले होते.' (In Pulwama police arrested six associates of the Lashkar e Taiba militant group)
दरम्यान, या मदतनीसांमध्ये लेल्हार काकापोरामधील रहिवासी रऊफ अहमद लोन उर्फ अमजीद, पंपोरमघील रहिवासी आकिब मकबूल भट, लार्वे काकापोरा येथील रहिवासी जावेद अहमद दार, परीगाम येथील रहिवासी अर्शीद अहमद मीर, रमीज राजा आणि मो. -उद्दीन दार, लार्वे काकापोरा येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून या आरोपींची चौकशी सुरु आहेत.
तसेच, पोलिसांनी पुढे सांगितले की, 'अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या सहकाऱ्यांना रसद पुरवणे, आश्रय देणे, पैशांचे व्यवस्थापन करणे आणि दहशतवाद्यांच्या हालचाली तसेच दहशतवादी म्हणून काम करण्यासाठी तरुणांची फसवणूक करणे यात गुंतलेले होते, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.'
शिवाय, हे सर्वजण सेदारगुंड काकापोरामधील दहशतवादी कमांडर रियाझ अहमद दार उर्फ खालिद उर्फ शिराज याच्या सतत संपर्कात होते. त्याच्या सूचनेनुसार ते जिल्ह्यात दहशतवादी कारवाया वाढवण्याचे काम करत होते, असेही तपास पथकाला समजले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.