Yasin Malik Dainik Gomantak
देश

यासिन मलिकची 'प्यार वाली लव्ह स्टोरी', वाचा संपूर्ण प्रकरण

यासिन मलिकला (Yasin Malik) टेरर फंडिंग प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्याला 19 मे रोजी दोषी ठरवले होते. यासिनच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाल्यास त्याने लव्ह मॅरेज केले आहे. त्याची पत्नी मुशाल हुसैन मलिक ही पाकिस्तानची रहिवासी आहे. दोघेही पाकिस्तानातच भेटले होते. त्यानंतर दोघांनी लग्न केले. चला तर मग जाणून घेऊया... (yasin malik verdict love and married with pakistani girl mushaal hussein who was 20 years younger than himself)

यासिनची पत्नी 20 वर्षांनी लहान आहे

यासिन मलिकची (Yasin Malik) पत्नी मुशाल हुसैन मलिकचा जन्म 1986 मध्ये कराची, पाकिस्तानमध्ये (Pakistan) झाला. तर यासिन मलिकचा जन्म 3 एप्रिल 1966 रोजी झाला. म्हणजे मुशाल यासिनपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे.

मुशाल ही श्रीमंत कुटुंबातील

मुशालचे वडील एमए हुसेन हे पाकिस्तानचे प्रसिद्ध अर्थतज्ञ होते. मुशालची आई रेहाना या पाकिस्तानी मुस्लिम लीगच्या नेत्या होत्या. मुशालचा भाऊ अमेरिकेत (America) परराष्ट्र धोरणातील विश्लेषक आहे.

2005 मध्ये दोघांची भेट झाली होती

मुशाल आणि यासिन यांची 2005 मध्ये भेट झाली होती. त्यावेळी यासिन भारताविरुद्ध कट रचण्यासाठी पाकिस्तानात गेला होता, असे सांगितले जाते. एका रॅलीत भाषण करुन यासिन बाहेर आला तेव्हा मुशाल त्याला भेटायला आली होती. मुशालने यासिनचा ऑटोग्राफही घेतला होता. मुशालने एका मुलाखतीतही या घटनेचा उल्लेख केला होता. मुशाल म्हणाली की, 'मला यासिनचे भाषण आवडले. मी त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि त्याचा ऑटोग्राफ घेतला.'

यासिनने व्यक्त केलं प्रेम

2005 नंतर मुशाल आणि यासिन सतत भेटू लागले. एका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुशालने सांगितले होते की, एके दिवशी यासिन मला म्हणाला, 'मला पाकिस्तान खूप आवडतो आणि विशेषत: तु मला खूप आवडते.'

आईने लग्न निश्चित केले

मुशालच्या आईला दोघांची लव्हस्टोरी समजली. यानंतर मुशालची आई यासिनसोबत हज यात्रेला गेली. तिथे त्यांनी दोघांचे लग्न निश्चित केले. दोघांनी 2009 मध्ये लग्न केले.

दोघांना एक मुलगी आहे

2009 मध्ये लग्नानंतर यासिन आणि मुशाल पाकिस्तान आणि दुबईमध्ये (Dubai) वारंवार भेटू लागले. 2012 मध्ये दोघांना एक मुलगी झाली. 'रझिया सुलतान' असे तिचे नाव आहे.

सुटकेची मागणी करत आहे

19 मे रोजी न्यायालयाने यासिन मलिकला दोषी ठरवल्यानंतर मुशालने सोशल मीडियावर मोहीम सुरु केली होती. ज्यामध्ये ती यासिनच्या सुटकेची मागणी करत राहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT