Yasin Malik & Osama Bin Laden  Dainik Gomantak
देश

Yasin Malik Terror Funding Case: 'लादेनवर खटला चालला नाही...'; तुषार मेहता यांच्या युक्तिवादावर न्यायाधीशांनी बाळगले मौन!

Delhi HC on Yaseen Malik: एनआयएने जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

Manish Jadhav

Yasin Malik Terror Funding Case: एनआयएने जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. टेरर फंडिंग प्रकरणी फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत एजन्सी हायकोर्टात पोहोचली होती, त्यावर सोमवारी रंजक वाद झाला.

एवढेच नाही तर यासीन मलिकला त्याची बाजू जाणून घेण्यासाठी कोर्टाने नोटीस बजावली आहे. याशिवाय, तिहार तुरुंग प्रशासनाला पुढील सुनावणीदरम्यान त्याला न्यायालयात हजर करण्यास सांगण्यात आले आहे.

यासीन मलिकला फाशी देण्याची मागणी करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ओसामा बिन लादेनचाही उल्लेख केला.

दरम्यान, यासीन मलिकची बिन लादेनशी तुलना करताना सॉलिसिटर जनरल म्हणाले की, "जर ओसामा बिन लादेनलाही या न्यायालयात आणले असते तर त्यालाही अशीच वागणूक मिळाली असती का?"

यावर या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठात सहभागी असलेले न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल म्हणाले की, 'दोघांमध्ये तुलना होऊ शकत नाही कारण लादेनवर कोणत्याही न्यायालयात खटला चाललेला नाही.'

यावर तुषार मेहता म्हणाले की, माझ्या मते अमेरिकेने (America) योग्यच केले. त्यानंतर न्यायमूर्ती मृदुल यांनी तुषार मेहता यांच्या टिप्पणीला प्रतिसाद दिला नाही.

दुसरीकडे, यासीन मलिक सध्या तिहार तुरुंगात असून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. 25 मे रोजीच ट्रायल कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याप्रकरणी तो दोषी आढळला आहे. ट्रायल कोर्टाच्याच निर्णयाला आव्हान देत NIA ने हायकोर्टात धाव घेतली आहे.

तसेच, NIA ची बाजू मांडणारे तुषार मेहता म्हणाले की, यासिन मलिकने केलेला गुन्हा जघन्य प्रकारात येतो. एसजी पुढे म्हणाले की, 'जर हा गुन्हाही अत्यंत जघन्य श्रेणीत ठेवला नाही, तर कोणाचा विचार केला जाईल? या प्रकरणात फाशीची शिक्षा दिली नाही तर उद्या सगळे दहशतवादी पुढे येऊन आपली चूक मान्य करुन माफी मागतील.'

ज्या दहशतवाद्यांना यासीनने वाचवले त्यांनीच मुंबई हल्ला केला.

यासीन मलिकने हवाई दलाच्या 4 अधिकाऱ्यांची हत्या केल्याचे सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयाला सांगितले. याशिवाय तत्कालीन गृहमंत्र्यांची मुलगी रुबैय्या सईद हिचेही अपहरण करण्यात आले होते.

त्या बदल्यात त्याने काही दहशतवाद्यांना सोडवले होते. या सुटका झालेल्या दहशतवाद्यांनी नंतर 26/11 चा दहशतवादी हल्ला केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

SCROLL FOR NEXT