Yashwant Sinha Dainik Gomantak
देश

यशवंत सिन्हा भरणार राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून उमेदवारी अर्ज

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत विरोधी पक्षांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

दैनिक गोमन्तक

President candidate 2022: राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत विरोधी पक्षांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. (yashwant sinha unanimously selected as oppn presidential candidate likely to file nomination on june)

दरम्यान, यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) 27 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करतील असे मानले जात आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षांच्या मागील बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीही मांडला होता, मात्र पवारांनी हा दावा मान्य करण्यास नकार दिला होता. याशिवाय गोपाळ कृष्ण गांधी यांचेही नाव पुढे आले होते.

दुसरीकडे, काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, 'यशवंत सिन्हा यांचा प्रचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.' काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, 'लोकशाहीचे रक्षण करु शकेल, असा उमेदवार आम्ही दिला आहे.'

तसेच, गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मल्लिकार्जुन खरगे, अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांशी संपर्क साधला होता. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही अनेक विरोधी नेत्यांशी संवाद साधला. मात्र, त्यानंतरही सरकारकडून विरोधकांसमोर कोणतेच नाव ठेवले गेले नाही. अद्यापही सत्ताधारी भाजपकडून अध्यक्षपदासाठी अधिकृत नाव पुढे आलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Goa News: डिपॉझिट रिफंड योजनेवरुन 'गोवा कॅन'चा धोक्याचा इशारा! विक्रेते व ग्राहकांमध्ये तंटा होण्याची वर्तवली शक्यता

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT