Yashasvi Jaiswal Dainik Gomantak
देश

Yashasvi Jaiswal: यू-टर्न! यशस्वी जयस्वाल पुन्हा मुंबईकडून खेळणार; गोवा क्रिकेट असोसिएशनने दिला दुजोरा

Yashasvi Jaiswal Mumbai cricket: भारताचा कसोटी संघातील युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) कडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने गोवा संघाकडून खेळण्याची घोषणा केली होती.

Sameer Amunekar

मुंबई : भारताचा कसोटी संघातील युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) कडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने गोवा क्रिकेट संघातून २०२५-२६ च्या मोसमात खेळण्याची घोषणा केली होती. पुन्हा एक मेल केला आणि त्याच्या NOC चा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी केली आहे. त्याने मुंबईकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव शंबा नाईक देसाई यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.

यशस्वी जयस्वालचा हा निर्णय क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. २३ वर्षीय डावखुरा फलंदाज यशस्वीने गेल्या काही वर्षांत आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याने पाच कसोटी सामन्यांत ४३.४४ च्या सरासरीने ३९१ धावा करत आपली क्षमताच दाखवून दिली होती.

यशस्वी जयस्वालने २०१९ मध्ये मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून तो मुंबई संघासाठी महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. त्याने ३६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १२ शतके आणि १२ अर्धशतकांसह एकूण ३,७१२ धावा केल्या आहेत.

गोवा संघातून खेळण्याचा निर्णय त्याने यंदाच्या रणजी मोसमाआधी घेतला होता. त्याच्या सहभागामुळे गोवा संघाला चांगल्या फलंदाजाची साथ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता त्याच्या मुंबई संघाकडून खेळण्याची निर्णय घेतला आहे.

आयपीएलमध्ये समाधानकारक कामगिरी

आयपीएल २०२५ मध्ये यशस्वी जयस्वालची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. राजस्थान संघाकडून खेळताना १२ सामन्यात त्यानं ४७३ धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

SCROLL FOR NEXT