Team India Dainik Gomantak
देश

IND vs SA 1 Test: टीम इंडियाला डबल झटका! लाजिरवाण्या पराभवानंतर WTC पॉईंट्स टेबलमध्ये घसरण; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

WTC Points Table 2025: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले.

Manish Jadhav

WTC Points Table 2025: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी अवघे 124 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र, तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाचा दुसरा डाव केवळ 93 धावांवर गडगडला आणि भारताला 30 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला.

भारताची फलंदाजी फ्लॉप

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी, विशेषत: मोहम्मद सिराजने, चांगली कामगिरी करुन दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 153 धावांत गुंडाळला होता. त्यामुळे भारतासमोर 124 धावांचे सोपे लक्ष्य होते. पहिल्या डावात भारताने (India) 189 धावा करुन 30 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. हे सोपे लक्ष्यही टीम इंडियाला गाठता आले नाही आणि केवळ 93 धावांवर संघ ऑलआऊट झाला. यामुळे भारताला हा पराभव पत्करावा लागला.

WTC पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फटका

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या पराभवामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या चौथ्या पर्वाच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फटका बसला. या मालिकेपूर्वी टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर होती, पण कोलकाता कसोटीतील पराभवानंतर टीम इंडिया थेट चौथ्या स्थानी घसरला. टीम इंडियाचे आता एकूण गुण 54.17 टक्के इतके आहेत. WTC च्या या सायकलमध्ये भारताने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, त्यापैकी चार सामन्यांत भारताने विजय मिळवला, तर तीन सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

दक्षिण आफ्रिकेला फायदा

याउलट, दक्षिण आफ्रिकेला या विजयाचा मोठा फायदा झाला. कोलकाता कसोटीतील विजयामुळे दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानावरुन थेट दुसऱ्या स्थानी पोहोचला. त्यांचे एकूण गुण 66.67 टक्के इतके झाले. त्यांनी या सायकलमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन सामने जिंकले.

इतर संघांची स्थिती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या पर्वाच्या पॉईंट्स टेबलमध्ये इतर संघांची स्थिती खालीलप्रमाणे.

  1. ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियाचा संघ 100 टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

  2. श्रीलंका: श्रीलंकेचा संघ 66.67 टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

  3. पाकिस्तान: पाकिस्तानचा संघ 50 टक्के गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

  4. इंग्लंड: इंग्लंडचा संघ 43.33 टक्के गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे.

  5. शेवटचे तीन संघ: बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड हे संघ अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंडने या WTC सायकलमध्ये अद्याप एकही सामना खेळलेला नाही.

या पराभवामुळे टीम इंडियाला (Team India) आता मालिकेतील दुसरा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा WTC फायनल गाठण्याचा त्यांचा मार्ग खडतर होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT