

Mohammed Siraj Wicket Video: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी अतिशय प्रभावी कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव केवळ 153 धावांत गुंडाळला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने दुसऱ्या डावात भेदक मारा करत केवळ दोन षटकांत दोन महत्त्वपूर्ण बळी घेतले. या सामन्यादरम्यान सिराजने फेकलेल्या एका चेंडूवर स्टंप्सचे अक्षरशः दोन तुकडे झाले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
सिराजने तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात गोलंदाजी करताना सनसनाटी निर्माण केली. त्याने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज सायमन हार्मर याला क्लीन बोल्ड केले आणि याचवेळी स्टंप्सचे दोन तुकडे झाले. हार्मर हा 20 चेंडूंमध्ये फक्त 7 धावा करुन बाद झाला. पण, ही विकेट विशेष ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील 54व्या षटकात सिराजने एक अप्रतिम चेंडू फेकला. हा चेंडू इतका वेगाने आणि अचूक टप्प्यावर पडला की, हार्मर पूर्णपणे गोंधळला. चेंडू थेट स्टंपवर आदळला आणि मधली स्टंप तुटून तिचे दोन तुकडे झाले.
हार्मर पूर्णपणे चकमा खाऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. याच चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला 153 धावांवर 9वा मोठा झटका बसला. या षटकातील शेवटच्या चेंडूवर सिराजने केशव महाराजला एलबीडब्ल्यू (LBW) बाद करत दक्षिण आफ्रिकेचा डाव 153 धावांवर संपवला.
कोलकाता कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) दोन्ही डावांमध्ये मिळून 4 विकेट्स घेतल्या. त्याने केवळ 2 षटके गोलंदाजी केली आणि 2 धावा देत 2 बळी घेतले. त्याची अचूकता आणि वेग जबरदस्त होता. सिराजने 12 षटके गोलंदाजी केली आणि 47 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. या संपूर्ण सामन्यात सिराजने एकूण 4 बळी घेत टीम इंडियाला चांगली आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला (Team India) विजयासाठी आता केवळ 124 धावा करण्याची आवश्यकता आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना 159 धावा केल्या होत्या. याला उत्तर म्हणून भारताने पहिल्या डावात 189 धावा केल्या, ज्यामुळे टीम इंडियाला 30 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात मात्र दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी पुन्हा एकदा अपयशी ठरली आणि ते केवळ 153 धावांवर ऑलआऊट झाले.
पहिल्या डावातील 30 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील 153 धावा, यामुळे टीम इंडियाला विजयासाठी एकूण 124 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. टीम इंडिया आता या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करुन मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्यासाठी सज्ज झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.