Rakesh Tikait in Support of Wrestlers Protest. Dainik Gomantak
देश

Wrestlers Protest: '...पण मुलींचा आक्रोश ऐकला नाही', राकेश टिकैत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Brijbhushan Sharan Singh : कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ दिल्लीला निघालेल्या राकेश टिकैत यांना गाझीपूरमध्ये रोखण्यात आले. गाझीपूर सीमेवर शेतकरी आणि पोलीस प्रशासन यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Rakesh Tikait On New Parliament Inauguration

एकीकडे जिथे रविवारी (28 मे) नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले, तिथे दुसरीकडे भारतीय किसान युनियनचे (BKU) नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते शेतकरी पंचायतीत म्हणाले की, देशात हुकूमशाही सुरू आहे. पैलवान मुलींना बळजबरीने रस्त्यावर ओढणाऱ्या केंद्र सरकारला आपलाच अभिमान वाटत आहे. सरकारची ही हुकूमशाही शेतकरी खपवून घेणार नाही.

ट्विटमध्ये ते म्हणाले की, “पैलवान मुलींना बळजबरीने रस्त्यावर खेचणाऱ्या केंद्र सरकारला संसदीय शिष्टाचाराचा अवमान करून अभिमान वाटत आहे, पण आज राज्यकर्त्यांना मुलींच्या किंकाळ्या ऐकू आल्या नाहीत. जोपर्यंत आमच्या मुलींची कोठडीतून सुटका होत नाही आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत शेतकरी गाझीपूर सीमेवर ठामपणे उभे राहतील.

कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ दिल्लीला निघालेल्या राकेश टिकैत यांना गाझीपूरमध्ये रोखण्यात आले. गाझीपूर सीमेवर शेतकरी आणि पोलीस प्रशासन यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. पोलिसांनी दिल्लीकडे जाणारे सर्व रस्ते अडवले.

यानंतर राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलक शेतकऱ्यांनी बॅरिकेडिंग तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. पोलिसांनी चोख बंदोबस्त केल्यानंतर राकेश टिकैत यांनी घोषणा केली की, जोपर्यंत दिल्लीत अटकेत असलेल्या पैलवानांची सुटका होत नाही, तोपर्यंत गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील.

खरं तर, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर ते संसद भवनापर्यंत कुस्तीपटूंच्या मोर्चासह धरण्याची जागा रिकामी केली आहे. तेथे लावलेले तंबूही हटवण्यात आले आहेत. विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यात आले आहे. आता टिकेट यांनी मुद्दा जोरदारपणे मांडला आहे.

ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई का नाही?

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले की, आम्हाला दिल्लीला जाण्यापासून रोखले जात आहे. जिल्ह्यांत शेतकऱ्यांची अडवणूक झाली आहे. ते म्हणाले की, 13 महिन्यांपासून आम्हाला दिल्लीला जाण्यापासून रोखले होते, हे तेच पोलिस आहेत.

टिकैत म्हणाले की, आम्ही संसदेला विरोध केलेला नाही. शेतकरी आपल्या सर्वांचा आवाज उठवत आहेत. महिला कुस्तीपटूंचा मुद्दा उपस्थित करत ते म्हणाले की, ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक झाली पाहिजे. कारवाई झाली असती तर इथे येण्याची गरजच पडली नसती. आता येथे शेतकऱ्यांची सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये पुढील रणनीती ठरवली जाणार आहे.

राकेश टिकैत म्हणाले की, ब्रिजभूषणला कोणत्याही परिस्थितीत अटक झाली पाहिजे, कारण त्याच्यावर गंभीर गुन्ह्याचा आरोप आहे. जर तो निर्दोष असेल तर त्याची सुटका होईल, असे सांगितले. उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी शेतकऱ्यांना रोखले जात असल्याचा आरोप टिकैत यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

SCROLL FOR NEXT