World Environment Day  Dainik Gomantak
देश

World Environment Day: सुदर्शन पटनाईक यांनी साकारले प्लास्टिकच्या बाटल्यांपासून कासवाचे अद्भुत वाळूशिल्प, पाहा व्हिडिओ

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जनजागृती आणि प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.

Puja Bonkile

World Environment Day: पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जनजागृती आणि प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी ओडिशातील पुरी बीचवर 2320 प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून कासवाचे अद्भुत वाळूचे शिल्प तयार केले आहे.

वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी ओडिशातील पुरी बीचवर 'Beat Plastic Pollution" अन प्लास्टिक इंडिया असा संदेश देणाऱ्या 2320 प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून कासवाचे अद्भुत वाळूचे शिल्प तयार केले. याचा व्हिडिओ (Video) एएनआयने सोशल मिडियार शेअर केला आहे. युजर्स या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

भारत आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक सुंदर पर्यटन स्थळे, नद्या, टेकड्या, तलाव आणि धबधबे आहेत. या ठिकाणांना प्रत्येक हंगामात पर्यटक भेट देतात. भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळाची सुंदर दृश्ये आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी लोक लांबून पोहोचतात.  या पर्यटन स्थळांच्या पर्यावरणाचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी  पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

  • कधी सुरू झाले? 

आनंदी आणि निरोगी जीवनासाठी पर्यावरणाचे संरक्षण आवश्यक आहे. 1972 पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. संयुक्त राष्ट्र संघाने 5 जून 1972 रोजी प्रथमच पर्यावरण दिन साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन जगभरात साजरा केला जातो. 

  • यावेळची थीम काय आहे? 

दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाची एक खास थीम असते. त्यानुसार तो साजरा केला जातो. 2019 मध्ये 'वायु प्रदूषण' ही थीम होती. तर 2020 मध्ये 'जैवविविधता', 2021 मध्ये 'पर्यावरणप्रणालीचे संवर्धन' आणि या वर्षी 2022 मध्ये 'Only One Earth' ही थीम होती. यावेळी प्लास्टिक प्रदूषणावर उपाय हा आहे. ही थीम प्लास्टिक प्रदूषणाच्या उपायावर आधारित आहे. 

  • निसर्गाला धोका वाढत आहे 

जगभरात प्रदूषणाची पातळी सतत वाढत आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाला धोका वाढत आहे. याला आळा घालण्याच्या उद्देशाने लोकांना पर्यावरणाबाबत जागरूकता यावी आणि निसर्गाला प्रदूषित होण्यापासून वाचवण्यासाठी प्रवृत्त करता यावे, या उद्देशाने पर्यावरण दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT