World Bank
World Bank Dainik Gomantak
देश

World Bank ने बंगाल सरकारला दिले 1000 कोटींचे कर्ज, यावर करावा लागणार खर्च

दैनिक गोमन्तक

जागतिक बँकेने पश्चिम बंगाल सरकारला सुमारे 1,000 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. जेणेकरुन गरीब आणि असुरक्षित गटांना सामाजिक सुरक्षा सेवांपर्यंत पोहोचण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना आर्थिक पाठबळ मिळेल. राज्य सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, या कर्जामुळे प्रशासनाला टेलिमेडिसिनद्वारे वैद्यकीय मदत, वृद्ध आणि अपंगांसाठी मदत, डिजिटल पेमेंटसह नागरिकांचा आर्थिक समावेश आणि सार्वजनिक योजनांच्या लाभांचे वितरण यासारख्या सेवा सुधारण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, जागतिक बँकेने (World Bank) 19 जानेवारी रोजी गरीब आणि असुरक्षित गटांना सामाजिक सुरक्षा सेवा वितरीत करण्यात मदत करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारला $125 दशलक्ष (सुमारे 1,000 कोटी) कर्ज मंजूर केले, असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तसेच, त्यात म्हटले आहे की, 'वेस्ट बंगाल बिल्डिंग स्टेट कॅपेबिलिटी फॉर इन्क्लुझिव्ह सोशल प्रोटेक्शन' या ऑपरेशन अंतर्गत दिलेले कर्ज या राज्याची आर्थिक क्षमता मजबूत करेल. त्याचबरोबर गरीब आणि असुरक्षित गटांसाठी सामाजिक मदत आणि लक्ष्यित सेवांमध्ये प्रवेश वाढवेल.

शिवाय, पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कर्जामुळे राज्याची व्याप्ती वाढवण्याची आणि हजारो गरीब लोकांपर्यंत त्याच्या कल्याणकारी कार्यक्रमांपर्यंत पोहोचण्याची क्षमता मजबूत होईल. ममता बॅनर्जी सरकार सामाजिक सहाय्य, संरक्षण, काळजी सेवा आणि रोजगार प्रदान करणारे 400 हून अधिक कार्यक्रम चालवते, असेही निवेदनात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Netravali: कथित शिकार प्रकरणी कदंबच्या 16 कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; महामंडळ दोन दिवसांत घेणार कारवाईचा निर्णय

New Education Policy In Goa: गोव्यात चार वर्षात नवे शैक्षणिक धोरण लागू होणार; यंदा नववीपासून तर पुढील वर्षी...

Konkan Railway Fine Collection: फुकट्यांना कोकण रेल्वेचा दणका, एप्रिलमध्ये 2.70 कोटी दंड वसूल

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

SCROLL FOR NEXT