महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५चा अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघांनी प्रथमच अंतिम फेरीत स्थान मिळवले असून, यंदा स्पर्धेला नवीन विजेता मिळणार हे निश्चित आहे. भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला हरवून अंतिम फेरी गाठली आहे. मात्र, सध्या चाहत्यांची सर्वात मोठी चिंता म्हणजे पावसाचा अंदाज आणि त्याचा या ऐतिहासिक सामन्यावर होणारा परिणाम.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाची घोषणा केली आहे. जर रविवार, २ नोव्हेंबर रोजी पाऊस झाला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर तो सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी हलवला जाईल. दोन्ही दिवशी शक्य तितका सामना खेळवण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु, जर राखीव दिवशीही पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर विजेता ठरवण्यासाठी ICC चे नियमानुसार पुढील प्रक्रिया लागू होईल.
हवामान विभागानुसार, मुंबईत रविवारी दुपारी आणि संध्याकाळी पावसाची ८४% शक्यता आहे. तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, तर रात्री २५ अंशांपर्यंत घसरेल. ताशी १८ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता होणार आहे. दिवसभर आर्द्रतेचे प्रमाण जास्त राहणार असून, ढगाळ वातावरण अपेक्षित आहे.
जर दोन्ही दिवशी म्हणजेच मुख्य दिवस आणि राखीव दिवस. सामना पावसामुळे रद्द झाला, तर ट्रॉफी दक्षिण आफ्रिकेच्या हातात जाण्याची शक्यता जास्त आहे. कारण, साखळी फेरीत दक्षिण आफ्रिका भारतापेक्षा वरच्या स्थानावर राहिली आहे. ICC च्या नियमांनुसार, अंतिम सामना रद्द झाल्यास विजेतेपद त्या संघाला मिळते ज्याने लीग टप्प्यात चांगले स्थान मिळवले असेल.
याशिवाय, दक्षिण आफ्रिकेने साखळी टप्प्यात भारतावर विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांना आणखी एक फायदा मिळेल.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा अंतिम सामना होणार असून, स्टेडियमची सर्व तिकीटं आधीच विकली गेली आहेत. दोन्ही संघांनी या स्पर्धेत अप्रतिम खेळ करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. भारतीय संघाची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे, तर दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ट आणि मरिझान कॅप यांच्यावर संघाचा तोल असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.