Corona Update Dainik Gomantak
देश

Corona Update: गोव्यातून गुरुग्रामला गेलेल्या महिलेला कोरोनाची लागण

दोन्ही रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.

Pramod Yadav

Corona Update: दिल्लीच्या जवळ असलेल्या गुरुग्राममध्ये कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. रविवारी एक महिला आणि तरुणामध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली.

संक्रमित दोघांचा प्रवास इतिहास आढळून आला आहे. महिला गोव्यातून परतली आहे, तर तरुण केरळहून परतला आहे. दोन्ही रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. गुरुग्राममध्ये डिसेंबरमध्ये 25 संक्रमित लोक आढळून आले.

गुरुग्राममध्ये एका दिवसात 125 कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये 60 जलद प्रतिजन आणि 65 RTPCR चाचण्या घेण्यात आल्या, सध्या 26 नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 11 हजार 620 जणांना लागण झाली आहे. तर 3 लाख 10 हजार 578 रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलेल्या नमुन्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

गोव्यात 57 सक्रिय कोरोना रुग्ण

गोव्यात सध्याच्या घडीला 57 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. रविवारी राज्यात 5 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली तर, 8 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला.

राज्याचा रिकव्हरी रेट 98.46 टक्के आहे. नुकतेच पार पडलेल्या सनबर्नमुळे राज्यात कोरोना वाढल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Trafficking: गोवा पोलिसांची धडक कारवाई! स्विगी डिलिव्हरी एजंटला ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक; 'इतक्या' हजारांचा गांजा जप्त

AUS vs SA: इतिहास घडला...! ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय पठ्ठ्यानं दक्षिण आफ्रिकेची तगडी फलंदाजी केली ध्वस्त; मोडला 38 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral Video: 'मत रो मेरे दिल...'! दारुच्या नशेत पकडल्यावर पठ्ठ्याला बायकोची आठवण, गाण्याला पोलिसानंही दिली साथ; व्हिडिओ एकदा बघाच

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

SCROLL FOR NEXT