West Bengal Dainik Gomantak
देश

West Bengal Viral News: धक्कादायक! तीन मुलांची आई मुलीला पाहण्यासाठी आलेल्या तरूणासोबत गेली पळून

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pramod Yadav

पश्चिम बंगालमधील मालदा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तरुण लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी गेला होता.

पण, तरुणाला मुलगी पसंत न पडता त्याचा मुलीच्या आईवरच जीव जडला आहे. धक्कादायक म्हणजे पुढे ते दोघे नंतर मुलीच्या आईसोबत पळूनही गेले.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बेपत्ता झाले प्रकरणी तक्रार नोंद करून महिलेचा शोध सुरू केला आहे.

मालदातील गजोल पोलीस स्टेशन हद्दीतील करकच पंचायतीच्या इचाहार गावात 25 मार्च रोजी ही घटना घडली. महिलेचा पती गजोळ याने पत्नीचा अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र, ती आतापर्यंत सापडलेली नाही.

25 मार्च रोजी एक तरुण आपल्या मुलीला लग्नासाठी पाहण्यासाठी आला होता. मात्र, तो माझ्या पत्नीसह फरार झाला. मात्र, जसजसा वेळ जात आहे, तसतशी चिंता वाढत असून, अद्याप मुलीच्या आईबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. असे महिलेच्या पतीने म्हटले आहे.

महिला तीन मुलांना सोडून आपल्या मुलीला पाहण्यासाठी आलेल्या तरुणासोबत पळून गेल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, महिलेचा पती बायकोचा फोटो घेऊन तिला शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरत आहे.

पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. महिलेचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे सोशल मिडियावर देखील विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. तरूणाने मुलीला पसंत न करता आईला पसंत केले शिवाय ते पळून देखील गेल्याने नेटकऱ्यांनी चांगलाच संपाप व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT