Women are becoming victims of their own people, 24.4 percent rise in cyber crime, NCRB Data:
दरवर्षीप्रमाणे यंदाही नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) आपली 2022 ची आकडेवारी जाहीर केली आहे.
या आकडेवारीनुसार देशात आत्महत्या, रस्ते अपघात आणि महिलांवरील गुन्हे वाढले आहेत. एवढेच नाही तर लहान मुलांवरील गुन्ह्यांबाबत बोलायचे झाले तर त्यातही वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे एनसीआरबीची आकडेवारी पाहिल्यानंतर असे आढळून आले की, आकस्मिक मृत्यूचे आकडेही वाढले आहेत.
विविध कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. नवे आव्हान बनलेल्या सायबर गुन्ह्यांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळेच कदाचित देशाच्या विविध भागात सायबर पोलीस स्टेशन्स उघडली जात आहेत, लोकांना सायबर गुन्ह्यांची माहिती दिली जात आहे जेणेकरून लोक सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचतील.
NCRB च्या आकडेवारीनुसार महिलांविरोधात मोठ्या प्रमाणात गुन्हे करणारे आरोपी हे दुसरे कोणी नसून त्यांचे नातेवाईकच आहेत.
महिलांवरील गुन्ह्यांची संख्या 2021 मध्ये 428278 होती, ती 2022 मध्ये वाढून 445256 झाली. हे 2021 च्या तुलनेत चार टक्के अधिक आहे.
आता याबाबत बोलायचे झाले तर ३१ टक्के गुन्ह्यांमध्ये पती किंवा त्याच्या नातेवाईकांचा सहभाग होता. तर 19.2 टक्के प्रकरणे महिलांवरील अपहरण आणि हल्ल्याची आहेत, आणि 18.1 टक्के विनयभंगाची आहेत, तर 7.1 टक्के बलात्काराची आहेत.
2022 मध्ये देशभरात सायबर गुन्ह्यांचे 65893 गुन्हे दाखल झाले होते. 2021 मध्ये देशभरात सायबर गुन्ह्यांशी संबंधित 52974 गुन्हे नोंदवले गेले. म्हणजे एका वर्षात 24.4% ची वाढ.
यातील सुमारे 65 टक्के प्रकरणे फसवणुकीची आहेत. म्हणजे 65893 प्रकरणांपैकी 42710 फसवणुकीचे गुन्हे आहेत. तर 3648 प्रकरणे खंडणीची आहेत.
सायबर गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी अनेक ठिकाणी सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र युनिट्स तयार करण्यात आली आहेत. राजधानी दिल्लीत प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशन उघडण्यात आले आहेत, याशिवाय विशेष सेलचे IFSO युनिट तज्ञ प्रकरणांची चौकशी करते.
या वर्षी असे अनेक व्हिडिओ आणि मोबाइल क्लिप समोर आल्या आहेत ज्यात कोणीतरी नाचत आहे, जीम करत आहे, खेळत आहे त्याचा अचानक पडून मृत्यू होतो. असे अनेक व्हिडिओ यावर्षी व्हायरल झाले.
2021 च्या तुलनेत 2022 मध्ये आकस्मिक मृत्यूची संख्या 11.6 ने वाढली आहे, जी खूप धक्कादायक आहे.
NCRB च्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये 56653 आकस्मिक मृत्यू झाले. यामध्ये 32410 मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाले आहेत, तर 24243 मृत्यू इतर कारणांमुळे झाले आहेत. अचानक मृत्यूची 19,456, ही सर्वाधिक संख्या 45 ते 60 वयोगटातील लोकांमध्ये होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.