Crime News Dainik Gomantak
देश

Jharkhand Crime: माणुसकीला काळिमा! झारखंडमध्ये महिलेला विवस्त्र करुन बेदम मारहाण, पोलिसांनी...

Jharkhand Crime: देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मणिपूरनंतर झारखंडमधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Jharkhand Crime: देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मणिपूरनंतर झारखंडमधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

येथील गिरिडीह जिल्ह्यातील सारिया पोलीस स्टेशन हद्दीतील कोबाडिया टोला गावात एका महिलेला विवस्त्र करुन झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली.

ज्या ठिकाणी हे घृणास्पद कृत्य घडले ते ठिकाण राज्याची राजधानी रांचीपासून सुमारे 170 किलोमीटर अंतरावर आहे.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ग्रामस्थांच्या मदतीने पीडितेला स्थानिक रुग्णालयात दाखल केले.

पीडित महिलेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी (Police) दोन महिलांसह चार गावकऱ्यांना अटक करुन या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. अवैध संबंधातून आरोपीने हा प्रकार केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

महिलेला विवस्त्र करुन मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फसवणूक करुन महिलेला रात्री उशिरा घराबाहेर बोलावले. त्यानंतर तिला जबरदस्तीने पकडून गावाबाहेर नेले. तिथे त्यांनी महिलेला विवस्त्र करुन झाडाला बांधून बेदम मारहाण केली.

विकास कुमार सोनार, श्रावण सोनार, मुन्नी देवी आणि रेखा देवी अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी आरोपींची (Accused) कसून चौकशी केली असता चारही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या सर्व आरोपींना आता तुरुंगात पाठवण्याची तयारी सारिया पोलीस ठाण्याने केली आहे.

पोलिसांनी चार आरोपींना अटक केली

गिरिडीह जिल्ह्यातील सरिया एसडीपीओ नौशाद आलम यांनी महिलेच्या वक्तव्याच्या आधारे चार आरोपींना अटक केल्याची पुष्टी केली आहे. एसडीपीओ म्हणाले की, या लज्जास्पद कृत्यात जो कोणी सहभागी असेल त्याला सोडले जाणार नाही.

दुसरीकडे, झारखंड विधानसभेचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारपासून सुरु होत आहे. गिरिडीह जिल्ह्यामधील सारिया पोलीस स्टेशन परिसरातील एका दलित महिलेच्या लज्जास्पद घटनेचा मुद्दा बनवून भाजपने राज्य सरकारला घेरण्याची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: वाळपईत वाहतूक कोंडी

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Virat Kohli: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

SCROLL FOR NEXT