Crime News Dainik Gomantak
देश

Rajasthan Crime: 'नोकरीचं आमिष, अनेकवेळा बलात्कार, नंतर 36 तुकडे करण्याची धमकी...', महिलेने सांगितली आपबिती

Rajasthan Crime: राजस्थानमधील धौलपूरमध्ये एका महिलेने सरकारी कर्मचाऱ्यावर नोकरीच्या बहाण्याने अनेकवेळा लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

Manish Jadhav

Rajasthan Crime: राजस्थानमधील धौलपूरमध्ये एका महिलेने सरकारी कर्मचाऱ्यावर नोकरीच्या बहाण्याने अनेकवेळा लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याची वैद्यकीय तपासणी केली. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

वास्तविक, धौलपूरच्या बारी येथे राहणाऱ्या एका महिलेचे (30 वर्षे) चार वर्षांपूर्वी पतीसोबत भांडण झाले होते. यानंतर ती दोन मुलांना घेऊन माहेरी आली. तिथे घरकाम करुन ती स्वतःचा आणि मुलांचा उदरनिर्वाह करत होती. दरम्यान, सहाय्यक विकास अधिकारी असलेल्या उमरेह गावातील सुरेंद्र सिंग यांच्याशी तिची मैत्री झाली.

'नोकरीच्या बहाण्याने अनेकवेळा बलात्कार'

दरम्यान, त्याने महिलेला (Women) खूप मदत केली आणि हळूहळू दोघांमध्ये जवळीकता वाढू लागली. सरकारी नोकरीच्या बहाण्याने गेल्या दोन वर्षांत अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला. एवढेच नाही तर त्याने 1 लाख 65 हजार रुपये घेतले. यानंतर त्याची वास्तविकता लक्षात येताच तिने त्याच्याकडे पैसे मागितले. यावर त्याने धमक्या देण्यास सुरुवात केली.

'पोलिसात तक्रार केली तर 36 तुकडे करण्याची धमकी'

पोलिसात (Police) तक्रार केल्यास तुझे 36 तुकडे करेन, असे तो म्हणाला. आपण बदमाशांच्या संपर्कात राहतो असेही त्याने सांगितल्याचे महिलेचे म्हणणे आहे. घाबरलेल्या महिलेने बारी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. यावर पोलिसांनी आयपीसी कलम 420, 406, 376 आणि 506 अंतर्गत एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जाहिराती थांबवल्या, कार्यक्रमही रद्द! गोवा पोलिसांच्या निर्देशानंतर 'टेल्स ऑफ कामसूत्रा'वर पडदा; आयोजकांनी व्यक्त केली दिलगिरी

Delhi Red Fort Blast: 2023 पासून दिल्ली 'टार्गेट'वर! बॉम्बस्फोटाची तयारी 2 वर्षांपासून सुरू होती; धक्कादायक खुलासा समोर

"अहवालानंतरच बोलेन!", पूजा नाईकच्या आरोपांवर वीजमंत्री ढवळीकरांची प्रतिक्रिया; Watch Video

Bicholim News:डिचोली शहराची सुरक्षा बेभरवशाची; 1 कोटी रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे 'शोभेची वस्तू'!

Bike Stunt Viral Video: यांना कायद्याची भीती नाही? गोव्यात तरूणांची हुल्लडबाजी; चालत्या दुचाकीवर उभं राहून धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT