Woman in Live In Relationship Can File Domestic Violence Case Says Kerala High Court. Dainik Gomantak
देश

"Live In Relationship मधील महिला कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल करू शकते"; हाय कोर्टाचा निर्वाळा

Live In Relationship: न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर प्रलंबित असलेले घरगुती हिंसाचाराचे हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात हस्तांतरित करता येणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.

Ashutosh Masgaunde

Woman in Live In Relationship Can File Domestic Violence Case Says Kerala High Court:

केरळ उच्च न्यायालयाने नुकतेच असे निरीक्षण नोंदवले आहे की जी महिला लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे, ती देखील डोमेस्टीक व्हायलेन्स कायद्याअंतर्गत कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल करू शकते.

न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन आणि न्यायमूर्ती पीजी अजितकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, ज्या स्त्रीशी तिचे घरगुती संबंध होते अशा पुरुषाकडून कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडणारी महिला डोमेस्टीक व्हायलेन्स (Domestic violence) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करू शकते.

खंडपीठाने असेही नमूद केले की, कायदा घरगुती नातेसंबंधाची व्याख्या दोन व्यक्तींमधला संबंध म्हणून करतो. जे सामायिक कुटुंबात एकत्र राहतात किंवा एकत्र राहिलेले असतात.

वरील व्याख्येवरून, हे लक्षात येती की केवळ एक महिलाच डोमेस्टीक व्हायलेन्स कायद्यांतर्गत सवलत मागते. पुढे, विवाहाच्या स्वरूपातील नातेसंबंधात राहणारी महिला देखील या कायद्यांतर्गत सवलत मिळविण्यास पात्र आहे. डोमेस्टीक व्हायलेन्स कायद्याच्या कलम 2(q) आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारी महिला कलम 12 अंतर्गत अर्ज घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल करू शकते.
न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन आणि न्यायमूर्ती पीजी अजितकुमार

एका व्यक्तीने डोमेस्टीक व्हायलेन्स कायद्याच्या कलम 12 अन्वये त्याच्याविरुद्ध न्यायदंडाधिकाऱ्यासमोर प्रलंबित असलेला खटला कौटुंबिक न्यायालयात हस्तांतरित करण्यासाठी अपील केले होते. त्यावर न्यायालय सुनावणी घेत होते.

भारतीय राज्यघटनेनुसार हमी दिलेल्या महिलांच्या अधिकारांचे अधिक प्रभावी संरक्षण करण्यासाठी डोमेस्टीक व्हायलेन्स कायदा लागू करण्यात आला आहे.

हे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने असे मत व्यक्त केले की जर महिलेने एखाद्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असेल तर तो कौटुंबिक न्यायलयाकडे किंवा दिवाणी न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याची परवानगी दिली जाते. यामुळे पीडित महिलेचे नुकसान होते.

न्यायालयाने असेही नमूद केले की जर कलम 12 अंतर्गत एखादे लिव्ह-इन रिलेशनशिपचे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात हस्तांतरित केले तर ते अयोग्य ठरेल. कारण कौटुंबिक न्यायालयात फक्त विवाहाच्या प्रकरणांचा निवडा होते.

या कारणांमुळे, न्यायालयाने असे मानले की डोमेस्टीक व्हायलेन्स कायद्याच्या कलम 12 अंतर्गत अर्ज मॅजिस्ट्रेटकडून कौटुंबिक न्यायालयात (Family Court) हस्तांतरित केला जाऊ शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT