crime Dainik Gomantak
देश

धक्कादायक ! निष्पाप मुलांसह आईने संपवली जीवनयात्रा, वाचा सविस्तर

राजधानी दिल्लीतील होलंबी कलान रेल्वे स्थानकाजवळ एका महिलेने तिच्या दोन मुलांसह मंगळवारी अमृतसर इंटरसिटी ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली.

दैनिक गोमन्तक

राजधानी दिल्लीतील होलंबी कलान रेल्वे स्थानकाजवळ एका महिलेने तिच्या दोन मुलांसह मंगळवारी अमृतसर इंटरसिटी ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या केली. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

दरम्यान, डीसीपी (Railways) हरेंद्र के सिंह यांनी सांगितले की, एका महिलेने दोन मुलांसह आत्महत्या केली. आज दुपारी 2:13 च्या सुमारास आरपीएफ नियंत्रण कक्षाने केएम पोल क्रमांक 20/22 जवळ एका महिलेला (Women) ट्रेनने धडक दिल्याची माहिती दिली.

दुसरीकडे, तपास अधिकारी ताबडतोब होलंबी कलान रेल्वे स्टेशनवर पोहोचले. अज्ञात महिलेसह दोन मुलांचे मृतदेह त्यांना मिळाले. एका मुलाचे वय सुमारे 4 ते 5 वर्षे आणि दुसऱ्याचे वय 10 महिने आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याचे डीसीपींनी सांगितले. या घटनेबाबत सीआरपीसी कलम 174 अन्वये कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी अधिक तपास केला असता ही आत्महत्येची घटना असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी (Police) अमृतसर इंटर सिटी ट्रेनचा चालक अशोक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोनवर सांगितले की, दोन मुलांसह महिला रुळावर आली होती आणि ट्रेन 100 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने जात होती, त्यामुळे ही घटना टाळता आली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT