Copy of Gomantak Banner  - 2021-02-04T222010.613.jpg
Copy of Gomantak Banner - 2021-02-04T222010.613.jpg 
देश

ग्रेटाचे नाव न घेता दिल्ली पोलिसांनी 'टूलकिट' संदर्भात केला गुन्हा दाखल

गोमन्तक वृत्तसेवा

केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी मागील दोन महिन्यापासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. आणि या आंदोलनाला देशातील काही व्यक्तींसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेलीब्रेटींनी देखील पाठिंबा दर्शविला आहे. पॉप स्टार रिहानासह स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने सोशल मीडियाच्या ट्विटरवरून भारतातील शेतकरी आंदोलनाला समर्थन दिले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरून शेतकरी आंदोलनावर मिळत असलेल्या पाठिंब्यावर भारत सरकारने निवेदन जाहीर करत प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर ग्रेटा थनबर्गने आपल्या ट्विटर खात्यावर शेतकरी आंदोलनासंबंधित 'टूलकिट' पोस्ट केली होती. यावर आता दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिल्ली पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेत, ग्रेटा थनबर्गने ट्विट केलेल्या 'टूलकिट'बाबत गुन्हा नोंदवला असल्याचे सांगितले. मात्र या एफआयआर मध्ये कोणाचेही नाव नमूद करण्यात आली नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. शेतकरी आंदोलनावरून सोशल मीडियाच्या ट्विटरवरील 300 पेक्षा अधिक खात्यांवर नजर ठेवून असल्याचे दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याशिवाय प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या हिंसक घटनेविषयी सुरु असलेल्या तपासात, सोशल मीडियावर देखील बारीक लक्ष असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. त्यानंतर सोशल मीडियावरील 'टूलकिट'च्या माध्यमातून देशातील वातावरण आणि भारत सरकारची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले असून, यासंबंधित एफआयआर नोंदवून तपास सुरु केल्याची माहिती दिली आहे. 

पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी आंदोलनाबाबतच्या 'टूलकिट' मध्ये एका ठराविक तारखेला 'ट्विटर स्टोर्म'चा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र या एफआयआर मध्ये ग्रेटा थनबर्गचे नाव नसल्याचे पोलिसांनी नमूद केले असून, तिने पोस्ट केलेल्या 'टूलकिट' नजर ठेवल्याचे सांगितले आहे. याव्यतिरिक्त या 'टूलकिट'वर तपास चालू केल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. व यासंदर्भात, 124 A (sedition), 153A, 153 आणि 120 B अन्वये गुन्हा दाखल केला असल्याचे दिल्ली पोलिसांनी अधोरेखित केले. 

दरम्यान, पॉप स्टार रिहानाने आपल्या सोशल मीडियावरील ट्विटर अकॉउंट वरून भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत एक पोस्ट शेअर केली होती. रिहानाने शेतकरी आंदोलन करत असलेल्या ठिकाणी इंटरनेटसेवा बंद करण्यात आल्याची एक बातमी पोस्ट करून, आम्ही याबद्दल का बोलत नाही? असे लिहीत, रिहानाने #FarmersProtest हा हॅशटॅग दिला होता. त्यानंतर जगातील सर्वात लहान पर्यावरण सामाजिक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने देखील सोशल मीडियाच्या ट्विटरवरून शेतकरी आंदोलनाला समर्थन दिले होते. शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट करताना ग्रेटाने, आम्ही भारतातील शेतकरी आंदोलनासोबत एकत्रित उभे असल्याचे म्हटले होते. आणि नंतर यासंबंधित 'टूलकिट' देखील तिने शेअर केले होते           
        

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Petrol-Diesel Price: राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किंचित बदल; वाचा सविस्तर दर

Jammu and Kashmir: कुलगाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर ठार; तीन दहशतवादीही ढेर

Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

SCROLL FOR NEXT