Winter Weather Update: Extreme cold in northern India

 

Dainik Gomantak

देश

Weather Update: उत्तर भारतात पडणार कडाक्याची थंडी

वेस्टर्न डिस्टर्बन्सचा उत्तर-पश्चिम भारतातील तापमानावर होऊ शकतो परिणाम

दैनिक गोमन्तक

दिल्लीसह (Delhi) उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडत आहे. आणि अजूनही किमान तापमानात घसरण सुरूच आहे. कडाक्याच्या थंडीपासून (cold ) बचावण्यासाठी लोक शेकोटीचा सहारा घेतांना दिसत आहेत, तर अनेक ठिकाणी प्रशासन बोनफायर, इत्यादी सुविधाही पुरवत आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार (Weather Update) राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज बुधवारी किमान तापमान 5 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तविली आहे, तर कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस राहील. त्याचबरोबर पंजाब-हरियाणामध्ये जोरदार धुके पडण्याची आहे.

उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, जम्मू-काश्मीर आदी राज्यांत पारा दिवसेंदिवस घसरत आहे. उत्तर प्रदेशातील शहरांबद्दल बोलायचे तर राजधानी लखनऊमध्ये आज किमान तापमान 5 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. याशिवाय कमाल तापमान 22 अंशांपर्यंत जाऊ शकते. सकाळी धुके कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र, दिवस जसजसा पुढे जाईल तसतसे धुके कमी होईल. त्याचप्रमाणे, गाझियाबादबद्दल बोलायचे झाल्यास, येथे किमान तापमान 7 आणि कमाल तापमान 21 अंश सेल्सिअस असू शकते.

राजस्थानमधील जयपूरमध्ये किमान तापमान 10 अंशांपर्यंत जाऊ शकते. कमाल तापमान 25 अंश असू शकते. याशिवाय चुरूमध्ये किमान तापमान 9 अंश आणि कमाल तापमान 25 अंश राहण्याची शक्यता आहे. Accuweather च्या मते, बुधवारी माउंट अबू येथे सर्वात कमी तापमान 10 अंश सेल्सिअस आणि सर्वोच्च तापमान 18 अंश सेल्सिअस राहील. याशिवाय डोंगराळ राज्यांमध्येही थंडीचा जोर कायम आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर इत्यादी ठिकाणी थंडी आणि बर्फवृष्टीमुळे लोकांच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला आहे.

येत्या काही दिवसांत दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स हवामान खराब करू शकतात , एकूण दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स एकापाठोपाठ एक येण्याची शक्यता आहेत, त्यामुळे उत्तर पश्चिम भारतातील तापमानावर परिणाम होऊ शकतो. पहिला वेस्टर्न डिस्टर्बन्स 24 आणि दुसरा 26 डिसेंबरला येईल. हवामान खात्यानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 24 ते 29 डिसेंबर दरम्यान पश्चिम हिमालयीन भागात हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. याशिवाय 26 ते 29 डिसेंबर 2021 दरम्यान उत्तर पश्चिम भारताच्या लगतच्या मैदानांवर हलक्या ते मध्यम विखुरलेल्या पावसाचीही शक्यता आहे. 23 डिसेंबरपासून उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील बहुतांश भागात थंडीची लाट कमी होण्याची अपेक्षा आहे. 23 ते 26 डिसेंबर दरम्यान, पंजाब आणि हरियाणामध्ये आणि 24 ते 26 डिसेंबर दरम्यान पश्चिम राजस्थानमध्ये एकाकी ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT