Seema Haider-Sachin Love Story Dainik Gomantak
देश

Seema Haider on Indian Citizenship: सीमा हैदरला भारताचे नागरिकत्व मिळणार का? काय आहेत नियम

Seema Haider-Sachin Love Story: हेरगिरीच्या आरोपांचा सामना करत असलेल्या सीमा हैदरला भारतीय नागरिकत्व मिळवायचे आहे. यासाठी तिने आता राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे.

Manish Jadhav

Seem Haider: देशात मागील काही दिवसांपासून सीमा हैदरची लव्हस्टोरी चर्चेत आहे. हेरगिरीच्या आरोपांचा सामना करत असलेल्या सीमा हैदरला भारतीय नागरिकत्व मिळवायचे आहे. यासाठी तिने आता राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे.

तिच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील वकील एपी सिंह यांनी हा अर्ज केला. सीमाने नागरिकत्व मिळवण्यासाठी पाकिस्तानी वंशाचा प्रसिद्ध गायक अदनान सामीचा हवाला दिला आहे.

अर्जामध्ये म्हटले आहे की, सीमा हैदरचे ग्रेटर नोएडा येथील सचिन मीना याच्यावर प्रेम आहे आणि तिला त्याच्यासोबत राहायचे आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सीमाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती केली की, जर तिला माफी दिली तर ती आयुष्यभर पतीसोबत राहू शकेल. सीमाने सांगितले की, प्रसिद्ध गायक अदनान सामीला भारतात दीर्घकाळ राहिल्यानंतर नागरिकत्व मिळाले.

अशा परिस्थितीत तिलाही नागरिकत्व (Citizenship) मिळायला हवे. परवानगी मिळाल्यानंतर ती भारतात सन्मानाने राहू शकेल, असे सीमाने सांगितले.

भारतात नागरिकत्व कसे मिळवायचे?

सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) वकील आशिष पांडे यांच्या मते, 'भारतात नागरिकत्व देण्याबाबत अनेक नियम आहेत. सीमा हैदरच्या प्रकरणाशी याचा संबंध जोडल्यास अनेक समस्या आहेत.' चला तर मग भारतात नागरिकत्व कसे मिळते ते जाणून घेऊया...

भारतीयाशी लग्न करणे: जर एखाद्या भारतीयाने परदेशी स्त्रीशी लग्न केले किंवा भारतीय मुलीने परदेशी मुलाशी लग्न केले, तर ती परदेशी मुलगी किंवा मुलगा भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करु शकतो.

मात्र, सीमा हैदरच्या बाबतीत हे सोपे नाही कारण ती अवैधरित्या भारतात पोहोचली आहे. कायदा सांगतो की, यासाठी सीमाला तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट द्यावा लागेल, त्यानंतर सचिनशी कायदेशीर विवाह केल्यानंतरच ती भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करु शकते.

11 ते 15 वर्षे भारतात राहणे: अधिवक्ता आशिष पांडे सांगतात, जर एखादा परदेशी व्यक्ती 11 ते 15 वर्षे भारतात राहत असेल तर तो भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करु शकतो.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जेव्हा तुमचा भारतात प्रवेश बेकायदेशीर नसेल तेव्हाच नागरिकत्व दिले जाईल. सीमा हैदरचा भारतातील (India) प्रवेश बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे, त्यामुळे मुदत पूर्ण करुनही तिला नागरिकत्व मिळणे कठीण आहे.

धार्मिक अल्पसंख्याक: नागरिक सुधारणा कायदा (CAA) सांगतो की, जर तुम्ही पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशात अल्पसंख्याक म्हणून राहत असाल, आणि 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आला असाल, तर तुम्हाला भारतीय नागरिकत्व मिळू शकते.

सीमा हैदरला अशा प्रकारे नागरिकत्व मिळणे सोपे जाणार नाही, कारण ती पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक नव्हती.

राज्यघटनेद्वारे: पांडे सांगतात, ज्या वेळी संविधान लागू झाले, त्या वेळी भारतात उपस्थित असलेल्या सर्व लोकांना भारतीय नागरिकत्व मिळाले, मग त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे असतील किंवा नसतील. याशिवाय भारतात जन्मलेल्याला जन्मतःच नागरिकत्व मिळते.

भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज कसा करावा

भारतातील नागरिकत्व मिळविण्यासाठी, गृह मंत्रालयाच्या परदेशी विभागामार्फत अर्ज केला जातो. भारतीय नागरिकत्वाशी संबंधित अधिकृत वेबसाइट https://indiancitizenshiponline.nic.in वर जावे लागेल. येथे नागरिक कायदा 1955 ची मार्गदर्शक तत्त्वे समजून घेणे आवश्यक आहे. मार्गदर्शक तत्त्वात भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी विविध पात्रता नमूद करण्यात आल्या आहेत.

उदाहरणार्थ, जर कोणी अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानात अल्पसंख्याक असेल आणि 31 डिसेंबर 2009 पर्यंत भारतात आला असेल, तर त्याला भारतीय नागरिकत्व मिळेल, मात्र त्यासाठी त्याला अर्ज करावा लागेल.

अशा अनेक अटी पोर्टलवर नमूद केल्या आहेत. विशेष म्हणजे, पात्रतेनुसार त्यांना ऑनलाइन फॉर्मसह आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT