Siddharamayya And DK Sivakumar Dainik Gomantak
देश

Bajrand Dal Ban in Karnataka: कर्नाटकात बजरंग दलावर बंदी घालणार का? काँग्रेसने स्पष्ट केली आपली भूमिका

Bajrand Dal Ban in Karnataka : कर्नाटकात बजरंग दलावर बंदी घालणार की नाही? यावर काँग्रेसच्या सूत्रांनी गुरुवारी (८ जून) उत्तर दिले. विधानसभा निवडणुकीवेळी बजरंग दलावर बंदी घालण्याचे कॉंग्रेसने आश्वासन दिले होते.

Ashutosh Masgaunde

Bajrand Dal Ban in Karnataka: कर्नाटकातील काँग्रेस सरकार सध्या बजरंग दलावर बंदी घालण्याच्या मूडमध्ये नाही. काँग्रेसच्या सूत्रांनी गुरुवारी (8 जून) सांगितले की, सिद्धरामय्या सरकार बजरंग दलावर बंदी घालणार नाही.

पीएफआय आणि बजरंग दलाचा उल्लेख जाहीरनाम्यात उदाहरणे म्हणून केल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी काळात शांतता आणि सौहार्दाच्या विरोधात कोणत्याही संघटनेने काम केल्यास कारवाई करू, असेही सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसची भूमिका

कर्नाटकात सत्तेत आल्यास बजरंग दल आणि पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालू, असे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते. पक्षाने जाहीरनाम्यात लिहिले की, ''कायदा आणि संविधान पवित्र आहेत, असे आमचे मत आहे.

अशा परिस्थितीत बजरंग दल किंवा पीएफआय सारखी व्यक्ती, संघटना द्वेष आणि शत्रुत्व पसरवत असेल तर आम्ही कारवाई करू. या संघटना बहुसंख्य किंवा अल्पसंख्याकांमध्ये असू शकतात. जर कोणी संविधानाचे उल्लंघन करत असेल तर अशा संघटनांवर कायद्यानुसार बंदी घालू.

बंजरग दल हा मोठा मुद्दा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या निवडणूक आश्वासनावर निशाणा साधला होता. बजरंगबलीच्या भक्तांना कोंडून ठेवण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या सभांमध्ये म्हटले होते.

यानंतर भाजप नेत्यांनी ठिकठिकाणी हनुमान चालिसाचे पठण केले. यावर काँग्रेसने म्हटले होते की, भगवान हनुमानाचा बजरंग दलाशी संबंध जोडणे योग्य नाही. यानंतर काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी हनुमानाची मंदिरे बांधण्याची घोषणा केली.

कर्नाटकात काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रचारादरम्यान बजरंग दलावर बंदी घालण्याच्या घोषणेनंतर, विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) म्हटले होते की, बजरंग दल बंदीच्या या धमकीला घाबरत नाही.

खरे तर, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात पक्ष सत्तेवर आल्यास बजरंग दल आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) सारख्या संघटनांवर राज्यात बंदी घालण्यात येईल, असे जाहीर केले होते.

विहिंपचे केंद्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे म्हणाले होते की, हिंदूंच्या द्वेषामुळे काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घातली तर आवश्यक ती पावले उचलली जातील रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान बजरंग दलावर बंदी घालण्यात आली होती, पण ती चुकीची असल्याचे सांगत न्यायालयाने ती रद्द केली होती.

कर्नाटकात काँग्रेसने 224 पैकी 135 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने 66 जागा जिंकल्या आणि जेडीएस केवळ 19 जागांवर घसरला. यानंतर काँग्रेस बजरंग दलावर कारवाई करेल, अशी अपेक्षा होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT