Wife's lack of cooking skills does not constitute cruelty, Kerala High Court. Dainik Gomantak
देश

Divorce: पत्नीकडे स्वयंपाक कौशल्य नसणे म्हणजे क्रूरता नाही: हायकोर्ट

Cooking Skills: याबरोबर पतीने असा दावा केला की, पत्नी एकदा त्याच्यावर थुंकली होती. यासाठी तिने नंतर पतीची माफी मागितली.

Ashutosh Masgaunde

Wife's lack of cooking skills does not constitute cruelty, Kerala High Court:

केरळ उच्च न्यायालय अनेकदा आपल्या निर्णयांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा असाच निर्णय देण्यात आला आहे.

जर पत्नीला स्वयंपाक कसा करावा हे माहित नसेल किंवा ती खराब स्वयंपाक करत असेल तर ते क्रौर्य मानले जाऊ शकत नाही असा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.

तसेच पत्नीकडे स्वयंपाक कौशल्य नसल्याच्या आधारावर केलेली घटस्फोटाची (Divorce) मागणी केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. जर पत्नीला स्वयंपाक कसा करायचा हे माहित नसेल तर ते क्रूरतेच्या श्रेणीत येत नाही आणि या आधारावर लग्न मोडता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

काय प्रकरण आहे?

एका व्यक्तीने पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. पत्नीला स्वयंपाक कसा करायचा हे माहित नसल्याचा आरोप पतीने केला होता.

यासोबतच पत्नी आपल्यासोबत गैरवर्तन करते आणि नातेवाईकांसमोर अपमानित करते, असेही पतीने म्हटले होते. पत्नीने आपली नोकरी धोक्यात आणण्याच्या उद्देशाने त्याच्याबद्दल कंपनीकडे तक्रार केली होती.

याबरोबर पतीने असा दावा केला की, पत्नी एकदा त्याच्यावर थुंकली होती. यासाठी तिने नंतर पतीची माफी मागितली.

पत्नीने आरोप फेटाळले

आपल्या बचावात, पत्नीने हे सर्व आरोप फेटाळले आणि सांगितले की, तिचा पती लैंगिक विकृतीने ग्रस्त आहे. तो तिच्या शरीराची चेष्टा करतो.

महिलेने सांगितले की, तिच्या पतीला मानसिक त्रास होत असून, त्याने औषधे घेणे बंद केले आहे. पत्नीने न्यायालयाला सांगितले की, तिला हे लग्न टिकवायचे आहे आणि याच उद्देशाने कंपनीला ईमेलही केला होता.

न्यायालयाचा निकाल

या प्रकरणावर न्यायालयाने पत्नीने पतीच्या कंपनीला पाठवलेला ईमेल वाचून दाखवला, त्यानंतर तिला पतीच्या वागणुकीबद्दल काळजी वाटत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

पती केरळहून यूएईला गेला होता आणि त्याची पत्नी त्याच्या बदललेल्या वागण्याने नाराज होऊन कंपनीकडे मदत मागत होती.

या प्रकरणी पतीने आपल्या याचिकेत पत्नीला स्वयंपाक करण्याचे कौशल्य नसल्याचे म्हटले होते. याबाबत न्यायमूर्ती अनिल के. नरेंद्रन आणि सोफी थॉमस म्हणाले की, खराब स्वयंपाकाला घटस्फोट घेण्यासाठी क्रूरता म्हणता येणार नाही.

न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, घटस्फोटाचे समर्थन करण्यासाठी पुरेशा कारणाशिवाय विवाह संपविण्याचा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही. यासह घटस्फोटाची याचिका फेटाळण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT