Crime News Dainik Gomantak
देश

बायकोच्या अफेअरबाबत पतीला कळालं, डंबलने ठेचून तिने नवऱ्याला संपवलं

Hyderabad Crime News: शेखच्या खुनाची माहिती शेजाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली

गोमंतक ऑनलाईन टीम

हैदराबाद: बायकोने नवऱ्याचा खून केल्याची घटना सरुरनगर येथे उघडकीस आली आहे. डंबलने ठेचून नवऱ्याला संपवल्याचा प्रकार शुक्रवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजता समोर आला. अफेअरबाबत पतीला समजल्यानंतर पत्नीने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शेखर (४०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, चिठ्ठी (३३) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. दोघांचा १६ वर्षापूर्वी विवाह झाला होता. नागरकुरनूल येथून गेल्या काही दिवसांपूर्वी दोघेजण सरुरनगर येथे कामानिमित्त स्थलांतरीत झाले होते. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. सरुरनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पत्नी चिठ्ठीला अटक करत तपासास सुरुवात केलीय.

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, चिठ्ठीचे हरीष नावाच्या व्यक्तीशी अफेअर सुरु असल्याची माहिती पती शेखरला समजली होती. यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती देखील समोर आलीय. दरम्यान, पत्नीने टोकाचे पाऊल उचलत पतीला डंबलने ठेचून संपवले. चिठ्ठीने सुरुवातीला यासाठी गुन्हा कबुल करण्यास नकार दिला. पण, चौकशीअंती तिने गुन्हा केल्याचे मान्य केले.

शेखच्या खुनाची माहिती शेजाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संशयित पत्नीला अटक केली. शेखच मृतेदह उत्तरीय तपासणीसाठी ओसमानिया शवागृहात पाठविण्यात आला आहे.

चिठ्ठीच्या बॉयफ्रेंड हरीषचा या खूनात काही सहभाग आहे का? त्याने यासाठी मदत केलीय का? याबाबत देखील पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, हरीष सध्या फरार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RGP Controversy: ‘त्‍या’ दहाजणांचे निलंबन मागे; आरजीपीचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष बोरकर यांच्‍याकडून आदेश जारी

धरणात विद्यार्थिनींसोबत आंघोळ अन् VIDEO व्हायरल! प्राचार्याच्या कृत्यावर संताप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये, थेट निलंबनाची कारवाई

Goa Tribal Reservation: आरक्षण म्हणजे फक्त आमदारकीची खुर्ची नव्हे; आदिवासींच्या सत्तेतील निर्णायक वाट्याचा लढा

Goa Nightlife: बर्च अग्निकांडांत 25 जणांचा होरपळून मृत्यू; तरीही गोव्याची नाईट लाईफ बिनधास्त! धडा कधी शिकणार?

आश्चर्यच! चार हात आणि चार पायांसह बाळाचा जन्म; पाहताच कुटुंबीयांना बसला धक्का, डॉक्टरांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT