पाकिस्तानने भारताने आपल्या हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. भारताकडून 124 किमी प्रतितास वेगाने येणारी क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या खानवाल जिल्ह्यात पडल्याचा दावा करण्यात आला होता. आता यावर भारत सरकारकडून स्पष्टीकरण आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे क्षेपणास्त्रला आग लागल्याचा दावा करण्यात आला होता. भारतानेही या घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून नियमित देखभालीदरम्यान हे क्षेपणास्त्र चुकून पडले असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने म्हटले आहे की त्यांचे हवाई दल त्यावर लक्ष ठेवून होते. त्यामुळे प्रश्न पडतो की, पाकिस्तानचे हवाई दल (Air Force) जेव्हा भारतातून येणाऱ्या क्षेपणास्त्रावर लक्ष ठेवून होते, तेव्हा त्यांनी गोळीबार का केला नाही?
पाकिस्तानचे हवाई दल भारतीय क्षेपणास्त्र का पाडू शकले नाही? पाकिस्तानच्या लष्कराने दावा केला की, क्षेपणास्त्राने भारतातील सिरसा येथून उड्डाण घेतल्याचे त्यांना माहित होते आणि काही वेळातच क्षेपणास्त्राने आपली दिशा बदलली आणि ते पाकिस्तानच्या दिशेने वळले. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या मियां चन्नू भागात पडले. पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिस पब्लिक रिलेशन्सचे (आयएसपीआर) महासंचालक मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले की, क्षेपणास्त्राने (missile) पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानचे हवाई दल भारतातून येणाऱ्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रावर सतत लक्ष ठेवून होते.
मात्र, पाकिस्तानच्या (pakistan) लष्कराने हे क्षेपणास्त्र पाडण्याचा प्रयत्न केला नाही आणि ते पाकिस्तानी हद्दीत स्वतःहून कोसळले. पाकिस्तान आणि भारतामध्ये सध्या कोणताही तणाव नसून दोन्ही देशांसाठी हा शांततेचा काळ आहे. ही रेड अलर्ट स्थिती नाही, त्यामुळे पाकिस्तानला क्षेपणास्त्र ओळखून ते पाडता आले नाही. असं असलं तरी, जेव्हा एखादी गोष्ट इतक्या वेगाने येत असते, तेव्हा तुम्ही फार कमी हालचाली करू शकता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.