Lawrence Bishnoi & Salman Khan Dainik Gomantak
देश

Who Is Lawrence Bishnoi: कोण आहे लॉरेन्स बिश्नोई? ज्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली

Lawrence Bishnoi: रविवारी संध्याकाळी वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची बातमी आहे.

Manish Jadhav

Who Is Lawrence Bishnoi: रविवारी संध्याकाळी वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची बातमी आहे. सलमान खानला ही धमकी तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने पाठवली होती.

ही धमकी सलमान खानच्या मॅनेजरला त्याच्या अधिकृत मेल आयडीवर पाठवण्यात आली, त्यानंतर त्याने तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली. लॉरेन्सने सलमान खानला पहिल्यांदाच धमकी दिली किंवा जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे नाही.

यापूर्वीही त्याने असे प्रकार केले आहेत. त्याच्या टोळीतील लोकांनी दोनदा सलमान खानपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेने त्यांचे मनसुबे उधळून लावले.

लॉरेन्स हा पंजाब पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा आहे

लॉरेन्स बिश्नोईचा जन्म 22 फेब्रुवारी 1992 रोजी पंजाबमधील (Punjab) फाजिल्का येथे झाला. लॉरेन्सचे वडील पोलीस हवालदार होते आणि आई गृहिणी. लॉरेन्सने आपल्या भावंडांसोबत सरकारी शाळेत शिक्षण घेतले.

यानंतर त्याने चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान त्याच्या मित्रांनी त्याला निवडणूक लढवण्यास प्रेरित केले. यानंतर लॉरेन्सने चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजच्या निवडणुकीतही भाग घेतला, ज्यामध्ये त्याला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

कॉलेजमध्ये गोल्डी ब्रारची भेट झाली

छात्र निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्याच्या आयुष्याला एक प्रकारे कलाटणीच मिळाली. त्यानंतर तो गोल्डी ब्रारच्या संपर्कात आला. दुसरीकडे, याच छात्र राजनीतीमुळे लॉरेन्स बिश्नोईच्या चुलत भावाची हत्या झाली.

लॉरेन्स आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गुन्हेगारी जगतात गेला. पंजाबच्या छात्र राजकारणात (Politics) दशकभर रक्तपात झाला. गोल्डी ब्रारचा चुलत भाऊ आणि माजी SOPU प्रदेशाध्यक्ष गुरलाल ब्रार याची ऑक्टोबर 2020 मध्ये हत्या झाली.

गुरलालच्या हत्येमध्ये सहभागी तरुणांना मुसेवालाने आपल्या घरात आश्रय दिल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवालेला आपले लक्ष्य बनवले होते. नंतर त्याच्याच गॅंगने त्याची हत्या केली.

मुसेवालाच्या हत्येनंतर खळबळ उडाली

सिद्धू मुसेवालेच्या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांनी घेतली. यानंतर पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली. गँगस्टर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांची मैत्री खूप जुनी आहे.

सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली

बिश्नोई गॅंगने यापूर्वीही बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 2018 मध्ये लॉरेन्स बिश्नोईला तुरुंगात ठेवण्यात आले होते.

त्यावेळी त्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमान खानवर काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर गँगस्टर लॉरेन्सने त्याच्या साथीदारांसोबत सलमानला मारण्याची योजना आखली होती.

2020 मध्ये पहिल्यांदा योजना अयशस्वी झाल्यानंतर शार्प शूटर राहुल उर्फ ​​बाबा याला दुसऱ्यांदा सलमानला मारण्यासाठी मुंबईत पाठवण्यात आले होते. मात्र मुसेवालेच्या हत्येनंतर पोलिसांच्या सतर्कतेने त्याचा बेत उधळला.

दुसरीकडे, लॉरेन्स बिश्नोईची गॅंग पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय आहे. अलीकडेच सलमान खानच्या वडिलांना धमकीचे पत्र आले होते. या पत्रातही सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT