White tigress Raksha Dainik Gomantak
देश

White tigress Raksha: दुर्मिळ असणाऱ्या पांढऱ्या वाघिणीने दिला तीन बछड्यांना जन्म, पाहा अद्भुत दृश्य

छत्तीसगडमधील भिलाई येथील मैत्रीबाग प्राणीसंग्रहालयात 'रक्षा' या पांढऱ्या वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला आहे,

Puja Bonkile

White tigress Raksha: छत्तीसगडमधील भिलाई येथील मैत्रीबाग प्राणीसंग्रहालयात 'रक्षा' या पांढऱ्या वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

वाघिणीने दीड महिन्यापूर्वी पिल्लांना जन्म दिला आणि प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने सोमवारी त्यांचे पहिले दृश्य सोशल मिडियावर शेअर केले आहे.

दुसरीकडे, राज्यातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मैत्रीबाग प्राणीसंग्रहालय भिलाईमध्ये लवकरच नवीन पाहुणे येणार आहेत. येथे रायपूरच्या जंगल सफारीतून नवीन प्राणी आणण्याचे नियोजन केले जात आहे. 

कोरानानंतर (Corona) मैत्रीबागमध्ये प्राण्यांची देवाणघेवाण होऊ शकली नाही, त्यामुळे बंगाल वाघ, गुजरात सिंह आणि बिबट्याची संख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीत रिकामे पिंजरे पाहून पर्यटकांचीही (Tourist) निराशा होत आहे. पण लवकरच मैत्रीबाग व्यवस्थापन पुन्हा एकदा या प्राण्यांना आणून पर्यटकांच्या चेहऱ्यावर हसू आणणार आहे.

प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी एनके जैन यांनी सांगितले की, रक्षा नावाच्या पांढऱ्या वाघिणीने 28 एप्रिल रोजी तीन पिल्लांना जन्म दिला होता. मात्र शनिवारी संबंधित माहिती सार्वजनिक करण्यात आली. पांढरा वाघ सुलतान हा या बछड्यांचा पिता आहे. पशुवैद्यकीय नियमांनुसार, स्तनपान आणि इतर आरोग्यविषयक बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी शावकांना आईसोबत एका अंधाऱ्या खोलीत ठेवण्यात आले आहे.

जैन म्हणाले की, चार महिन्यांचा देखरेखीनंतर कालावधी पूर्ण झाल्यानंतर या वाघाच्या पिल्लांना सर्वसामान्यांना पाहण्यासाठी बंदिस्तात सोडले जाईल. जैन यांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रोमा नावाच्या पांढऱ्या वाघिणीने एका पिल्लाला जन्म दिला होता, त्याचे नाव 'सिंघम' ठेवण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की या वाघाच्या पिलाचे वडील देखील 'सुलतान' नावाचा पांढरा वाघ आहे.

सध्या प्राणीसंग्रहालयात एकूण नऊ पांढऱ्या वाघांचा समावेश आहे, त्यात एप्रिलमध्ये जन्मलेल्या तीन वाघांच्या पिल्लांचा समावेश आहे, असे जैन म्हणाले. 1997 मध्ये पांढऱ्या वाघांची जोडी-तरुण आणि तापसी यांना शेजारच्या ओडिशा राज्यातील नंदन-कानन प्राणीसंग्रहालयातून पहिल्यांदा मैत्री बागेत हलवण्यात आले. देशातील सर्वात मोठी पोलाद उत्पादक स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) चे प्रमुख युनिट भिलाई स्टील प्लांट (BSP) द्वारे मैत्री बागची देखभाल केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT