Madras High Court Dainik Gomantak
देश

अल्पवयीन मुलीच्या गर्भपातासाठी ओळखीचा पुरावा गरजेचा नाही; गैरप्रकार टाळण्यासाठी हाय कोर्टाचा निर्णय

"जर अहवालासाठी अल्पवयीन मुलीचे नाव उघड करण्याचा आग्रह धरल्यास अनेक प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुले नोंदणीकृत डॉक्टरांएवजी दुसरा कोणतातरी गैर मार्ग पकडतील."

Ashutosh Masgaunde

IF Minor Seeks to Terminate Pregnancy Arising Out of Consensual Sexual Relationship Need Not to Disclose Identity, Says Madras High Court:

अल्पवयीन मुलांमध्ये संमतीने लैंगिक संबंध असल्याच्या प्रकरणांमध्ये, जर मुलगी किंवा तिच्या पालकाला कायदेशीररित्या लढायचे नसेल तर पोक्सो अंतर्गत अहवालासाठी अल्पवयीन मुलीच्या नावाचा आग्रह न धरता गर्भधारणा संपुष्टात आणली जाऊ शकते.

लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे निकाली काढताना मद्रास उच्च न्यायालयाने असे निरिक्षण नोंदवले.

जर अहवालासाठी अल्पवयीन मुलीचे नाव उघड करण्याचा आग्रह धरल्यास अनेक प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुले नोंदणीकृत डॉक्टरांएवजी दुसरा कोणतातरी गैर मार्ग पकडतील, असे मत न्यायमूर्ती एन आनंद व्यंकटेश आणि न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्या विशेष खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत व्यक्त केले.

आपला मुद्दा पुढे करत मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, बलात्कार पीडितांची टू फिंगर टेस्ट कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाही. कारण या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने आधीच निर्णय दिला आहे.

हायमेनमध्ये काही दुखापत आहे की नाही हे डॉक्टरांना शोधायचे असेल तर त्यासाठी कोणतेही एक साधन वापरता येईल. न्यायालयाने म्हटले की, लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये पुन्हा-पुन्हा क्षमता चाचणी करण्याची गरज नाही.

पुरुषत्व चाचणीबाबत बोलताना मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले की, लैंगिक गुन्हा करणारी व्यक्ती पुरूष हे गृहित धरुनच न्यायालयाने काम केले पाहिजे.

अशा परिस्थितीत आरोपीने पळवाट काढण्यासाठी नपुंसकतेचे कारण पुढे केले तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी त्याच आरोपीवर असेल.

गुरुवारी जेव्हा हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात आले, तेव्हा तामिळनाडूच्या पोलिस महासंचालकांनी एक अहवाल दाखल केला, ज्यामध्ये न्यायालयाने नमूद केलेल्या 1,274 पैकी 111 लैंगिक प्रकरणांमध्ये सहमतीने अल्पवयीन मुलांचा समावेश होता. तसेच यातील काही प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असून काहींचा तपास अजून सुरू आहे.

आता या प्रकरणांमधील पीडितेच्या तक्रारदार/पालकांशी पोलीस संपर्क साधतील आणि त्यांची संमती असल्यास न्यायालय कार्यवाही रद्द करण्याचे आदेश देऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

SCROLL FOR NEXT