K. Chandrasekhar Rao Dainik Gomantak
देश

'सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागण्यात गैर काय'

निवडणुका आल्या की, भाजप सीमेवर तणाव निर्माण करतो किंवा धर्माच्या नावावर मत मिळवण्यासाठी लोकांना भडकवतो, हे योग्य नाही.

दैनिक गोमन्तक

तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहेत. रविवारी भाजपची खिल्ली उडवत राव यांनी पक्षावर राज्याच्या निवडणुका जिंकण्यासाठी धर्म आणि लष्कराचा वापर केल्याचा आरोप केला. हैदराबादमधील प्रगती भवन येथे माध्यमांना संबोधित करताना चंद्रशेखर राव यांनी दावा केला की, भाजप मतदान असलेल्या राज्यांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकचा वापर करत आहे.(K. Chandrasekhar Rao)

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले की, "सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागण्यात काहीही चुकीचे नाही. मी आत्ताच विचारत आहे. भाजप खोटा प्रचार करत आहे. आता बिपीन रावत यांची छायाचित्रे वापरली जात आहेत. काय मूर्खपणा आहे."

चंद्रशेखर राव हे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या उत्तराखंडमधील (Uttarakhand) भाषणाचा संदर्भ देत होते जिथे त्यांनी 2016 च्या सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रश्न केला. केसीआर म्हणाले, "भाजपला राजकीय फायद्यासाठी सर्जिकल स्ट्राइकचा वापर करायचा आहे. आम्ही यावर नक्कीच प्रश्न करू. हल्ल्याचे श्रेय हे लष्करालाच मिळायला हवे."

ते म्हणाले की, "निवडणुका आल्या की, भाजप सीमेवर तणाव निर्माण करतो किंवा धर्माच्या नावावर मत मिळवण्यासाठी लोकांना भडकवतो. हे योग्य नाही." केसीआर यांनी वीज क्षेत्रातील सुधारणांना विरोध करणे सुरूच ठेवले आणि सांगितले की त्यांच्या सरकारने तेलंगणा विधानसभेत त्याविरोधात ठराव मंजूर केला आहे. "वीज सुधारणा विधेयकाचा मसुदा आम्हाला पाठवण्यात आला होता. मी त्याबद्दल पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं. तेलंगणा विधानसभेत त्याविरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला," असही ते म्हणाले.

केसीआर यांनी 2025 पर्यंत भारताला USD 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याच्या केंद्राच्या व्हिजनला "खोटा प्रचार" म्हटले. ते म्हणाले की, "एक क्लर्क भारताला 5 ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनवू शकतो, पीएम, एफएमची गरज नाही. ही एक गुंतागुंतीची वस्तुस्थिती आहे."

भाजप सरकारने देश उद्ध्वस्त केला: केसीआर

केसीआर म्हणाले की, भाजप (Bjp) सरकार देशाला पुर्णपणे 'उद्ध्वस्त' करत आहे. "77 टक्के संपत्ती ही 10 टक्के भारताकडे आहे,". औद्योगिक उत्पादनात मोठी घट झाल्याचेही ते म्हणाले. 4.4 टक्के ते 0.4 टक्के. मेक इन इंडिया किंवा तुमच्या धोरणांचे हे दहा परिणाम आहेत.

'उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर भाव वाढतील'

इंधनाच्या कमी दरावर बोलताना केसीआर म्हणाले की, उत्तर प्रदेशातील निवडणुका संपल्यानंतर केंद्र सरकार पुन्हा किमती वाढवणार आहे. ते म्हणाले की, ते लोकशाहीचा आदर करत नाहीत.

'तुमची कृती योग्य आहे तर शेतकऱ्यांची माफी का मागितली'

कृषीविषयक कायदे मागे घेतल्यानंतर पंतप्रधान शेतकऱ्यांची माफी का मागतात, असा सवाल करत केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) ताशेरे ओढले. "जर तुमची कृती योग्य असेल तर तुम्ही शेतकऱ्यांची माफी का मागता. पंतप्रधानांना माफी मागण्याची सवय लागली आहे," असा टोला ही त्यांनी लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT