Republic Day 2023 Dainik Gomantak
देश

Republic Day 2023: प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामागचं नेमकं कारण काय?

26 जानेवारी रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

26 जानेवारी 2023 रोजी आपण भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करत आहोत. सन 1950 साली 26 जानेवारी रोजी भारताची राज्यघटना (Indian Constitution) अंमलात आली आणि भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला. परंतु भारत प्रजासत्ताक झाला म्हणजे नेमकं काय झालं? वाचा...

सुमारे 150 वर्षांच्या गुलामगिरीनंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश ब्रिटीशांच्या बंधनातून स्वतंत्र (Independence Day) झाला. परंतु भारत स्वतंत्र झाला असला तरी तो कसा चालवला जाणार याबाबत कोणताही अधिकृत मार्ग ठरला नव्हता. स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे ब्रिटीशांच्या कायद्यानेच राज्य चालले. भारतातील निर्णय प्रक्रिया तसेच धोरणे ठरवण्याची प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी राज्यघटना महत्त्वाची होती आणि स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेच्या माध्यमातून ती ठरवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.

भारत देश प्रजासत्ताक झाला तो 26 जानेवारी 1950 या दिवशी. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि त्याची आठवण म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. खरतंर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने संविधान स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 पासून ते अंमलात आणले.

  • 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच नव्हतं.

  • स्वातंत्र्यदिनाला तिरंगा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर 26 जानेवारीला तिरंग्याची बंद घडी करून दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेला जातो नंतर फक्त फक्त दोरी ओढून झेंडा फडकवण्यात येतो. ज्याला ध्वज फडकावणे म्हणतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job घोटाळा करुन तो 'गेला', देणाऱ्यांना मात्र ‘सुतक’; मडगाव इस्‍पितळात कर्मचाऱ्याकडून सहकाऱ्यांना लाखोंना गंडा

Rashi Bhavishya 19 November 2024: धनलाभ होईल, मात्र लगेच हे पैसे खर्च करू नका; त्याआधी जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT