Sammed Shikharji Dainik Gomantak
देश

Sammed Shikharji: काय आहे सम्मेद शिखरजी वाद? झारखंड सरकारच्या निर्णयावर गदारोळ का झाला?

देशभरात जैन समुदायाकडून निषेध, निदर्शने

Akshay Nirmale

Sammed Shikharji: झारखंड सरकारने श्री सम्मेद शिखरजी हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यामुळे संपूर्ण भारतभरातून जैन समाजाकडून या निर्णयाचा निषेध केला जात आहे. हा वाद नेमका आहे काय, ते जाणून घेऊया.

झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात असलेल्या श्री सम्मेद शिखरजीला पार्श्वनाथ पर्वत म्हणूनही ओळखले जाते. जैन धर्मीय मान्यतेनुसार 24 पैकी 20 जैन तीर्थंकर आणि भिक्षूंनी येथे मोक्ष प्राप्त केला.

सम्मेद शिखरजी हे जैनांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. जैन समुदायाच्या मते, सम्मेद शिखरजींचा प्रत्येक कण अत्यंत पवित्र आहे. जैन समाज सम्मेद शिखरजींच्या 27 किलोमीटर परिसरात असलेल्या मंदिरांना भेट देतो आणि पूजा करतो. जैन लोक पूजेनंतरच खातात आणि पितात. या पवित्र स्थानाचे पावित्र्य जपले जावे, असे त्यांना वाटते.

वाद का निर्माण झाला?

झारखंड सरकारने या ठिकाणाला इको-स्पॉट म्हणून घोषित करून पिकनिक स्पॉटमध्ये रूपांतरित केले. यामुळे जैन भाविक चिडले आहेत. कर्नाटक, झारखंड आणि मध्य प्रदेशातील जैन समुदायाने विविध ठिकाणी मूक निदर्शने केली आहेत.

अलीकडेच लोकसभेत बोलताना भाजपचे खासदार मनोज तिवारी म्हणाले, 'झारखंड सरकारच्या निर्णयाचा थेट परिणाम सम्मेद शिखरच्या पावित्र्यावर झाला आहे. हा आदेश रद्द व्हावा, अशी जैनांची इच्छा आहे.

विश्व जैन संघटनेचे संजय जैन म्हणाले, "पार्श्वनाथ पर्वतावर कोणताही प्रोटोकॉल पाळला जात नाही, बरेच लोक पर्यटक म्हणून तिथे जातात. आम्हाला माता वैष्णोदेवीसारखा प्रोटोकॉल हवा आहे. तिथे चेकपोस्ट, बॅरिकेडिंग किंवा सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. कोणीही प्रवेश करू शकतो; यामुळे आमचे धार्मिक स्थळ अपवित्र होत आहे. पर्यटन स्थळ घोषित झाल्यानंतर मांसाहारी लोक तेथे दर्शनासाठी येतील, त्याशिवाय ते जोडे घालून मंदिरात येतात, त्यामुळे तीर्थक्षेत्र प्रदूषित होते.

झारखंड सरकारच्या निर्णयाविरोधात दिल्लीत जैन समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात निदर्शने करत आहेत. सरकारने निर्णय मागे न घेतल्यास देशभरात आंदोलन सुरूच ठेवण्याची मागणी जैन समुदायाने केली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास राजधानी दिल्लीत चक्काजाम करण्याचाही इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT