Ramayana Circuit Dainik Gomantak
देश

Ramayana Circuit: काय आहे मोदी सरकारची रामायण सर्किट योजना, देशातील 'या' राज्यांना...

Ramayana Circuit: रामायण सर्किट योजनेत केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 9 राज्यांमध्ये 15 ठिकाणे चिन्हित केली आहेत. या योजनेतर्गंत ही सर्व शहरे रेल्वे, रस्ते आणि विमान प्रवासाद्वारे जोडली जातील.

Manish Jadhav

Ramayana Circuit: रामायण सर्किट ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतर्गंत सरकारला देशातील त्या सर्व ठिकाणांना जोडायचे आहे, जिथे भगवान श्रीराम गेले होते. रामायण सर्किट योजनेत केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 9 राज्यांमध्ये 15 ठिकाणे चिन्हित केली आहेत. या योजनेतर्गंत ही सर्व शहरे रेल्वे, रस्ते आणि विमान प्रवासाद्वारे जोडली जातील.

दरम्यान, या योजनेतर्गंत विकासाचे प्रकल्प राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशाशी सल्लामसलत केल्यानंतर ठरवले जातात. त्याचबरोबर, शेजारील देशांशीही या योजनेच्या माध्यमातून कनेक्ट करण्याचा सरकारचा मानस आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नेपाळचे (Nepal) पंतप्रधान पुष्पकुमार दहल यांची भेट घेतली. या बैठकीनंतर पीएम मोदी म्हणाले की, रामायण सर्किटच्या विकासकामांना गती दिली जाईल.

रामायण सर्किट योजनेतील राज्ये

उत्तर प्रदेश, बिहार (Bihar), मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक ही देशातील रामायण सर्किटमध्ये येणारी राज्ये आहेत. अयोध्या, शृंगवरपूर, नंदीग्राम आणि यूपीचे चित्रकूट, बिहारचे सीतामढी, बक्सर, दरभंगा या प्रकल्पाचा भाग आहेत. यामध्ये मध्य प्रदेशचे चित्रकूट, छत्तीसगडचे जगदलपूर यांचाही समावेश करण्यात आला आहे.

दुसरीकडे, ओडिशातील महेंद्रगिरी आणि तेलंगणातील भद्रचलन, तामिळनाडूमधील रामेश्वरम आणि कर्नाटकातील हम्पी या दक्षिणेकडील राज्यांमध्ये रामायण सर्किट योजनेचा भाग बनवण्यात आला आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर आणि नाशिक शहरांचाही समावेश करण्यात आला आहे. एकूणच पूर्वेपासून दक्षिणेपर्यंत सर्व राज्यांना या प्रकल्पाचा भाग बनवण्यात आले आहे.

रामायण सर्किट प्लॅनमध्ये काय आहे?

रामायण सर्किट योजनेंतर्गत या सर्व शहरांमध्ये वाहतूक व्यवस्था बळकट केली जाईल, त्याचवेळी रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर भर दिला जाईल. निवडक 15 शहरांपैकी जिथे विमानतळ नाही अशा शहरांमध्ये नवीन विमानतळ बांधण्यात येणार आहे.

सर्व शहरे राष्ट्रीय महामार्गाने जोडली जातील. रामायण सर्किटला भेट देणाऱ्या पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालय प्रयत्नशील आहे. हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावेत यासाठी सरकार वेगाने काम करत आहे.

अयोध्येत सरयूच्या तीरावर रामाचा भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे

यूपीमध्ये एकीकडे अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीचे काम जोरात सुरु आहे. तर सरयू नदीकाठी भगवान रामाची 250 मीटरची मूर्ती बसवण्याची तयारी सुरु आहे.

प्रभू रामाच्या कांस्य पुतळ्याची उंची 200 मीटर असेल आणि त्याच्या खाली 50 मीटर उंचीची पायाभूत इमारत बांधण्यात येणार आहे.

यासोबतच येथे एक म्युझियम बांधण्यात येणार असून, त्यात रामकथेची माहिती दिली जाणार आहे. या संग्रहालयात यज्ञशाळाही बांधण्यात येणार आहे. संग्रहालयाच्या उभारणीसाठी एकूण 225 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. IRCTC रामायण यात्रेसाठी विशेष ट्रेन देखील चालवत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: स्टंट, म्युझीक आणि बरंच काही... गोव्यात होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बाईक इव्हेंटचे वेळापत्रक प्रसिद्ध

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT