What is LGBTQ Community, how are they different from each other. Dainik Gomantak
देश

Same Gender Marriage: LGBT म्हणजे काय, ते एकमेकांपासून वेगळे कसे असतात?

Ashutosh Masgaunde

What is LGBTQ Community, how are they different from each other:

सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे. न्यालयाचेन 17 ऑक्टोबर रोजी (आज) या प्रकरणावर निर्णय देताना म्हटले की समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणे हे संसद आणि राज्य विधानमंडळांचे काम आहे.

दरम्यान, LGBT समूहाविषयी याबाबत सध्या खूप चर्चा होत आहे. परंतु बऱ्याच लोकांना त्याचे पूर्ण रूप माहित नाही. तसेच यामध्ये विविध कम्युनिटीतील लोकांचा सहभाग असल्याची माहिती नाही.

L फॉर लेस्बियन

LGBT मध्ये L म्हणजे लेस्बियन. जेव्हा एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवते तेव्हा तिला लेस्बियन म्हणतात. लेस्बियन महिला सर्वोच्च न्यायालयाकडे महिलांबरोबर लग्नाला मान्यता देण्याची मागणी करत आहेत.

G फॉर गे

LGBT मधील G म्हणजे समलिंगी लोक. जेव्हा दोन मुले एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवतात तेव्हा त्यांना गे म्हणतात.

बी फॉर बायसेक्सुअल

बायसेक्सुअल लोक ते असतात जे स्त्री आणि पुरुष दोघांसोबत लैंगिक संबंध ठेवतात. उदाहरणार्थ, जर एखादी स्त्री बायसेक्सुअल असेल तर तिचे केवळ पुरुषाशीच नाही, तर ती स्त्रीशीही संबंध ठेवू शकते.

T फॉर ट्रान्सजेंडर

ट्रान्सजेंडर हे एलजीबीटी समुदायाचे सर्वात महत्त्वाचे पैलू आहेत. त्यांना समजून घेणे थोडे अवघड आहे. यामध्ये अशा लोकांचा समावेश होतो ज्यांचे लिंग जन्मतः वेगळे असते, परंतु जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांना ते विरुद्ध लिंगी असल्याचे वाटते.

उदाहरणार्थ, नवजात बाळाला डॉक्टरांनी लिंगाच्या आधारावर मुलगा आहे म्हणून सांगितले होते, परंतु जेव्हा तो मोठा झाला तेव्हा त्याला आंतरिकरित्या असे वाटले की ती मुलगी आहे. यानंतर, जर तो मुलीप्रमाणे कपडे घालू लागला तर त्याला ट्रान्सजेंडर मानले जाईल. अनेक ट्रान्सजेंडर आता त्यांचे लिंग बदलत आहेत.

सर्व एकमेकांपेक्षा वेगळे

LGBT हा शब्द वापरला जातो तेव्हा असे दिसते की, ते एकच असतात, परंतु त्यात लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर यांचा समावेश होतो. ते सर्व एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून हे सर्वजण न्यायालय आणि सरकारकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अधिकारांची मागणी करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

Goa Navratri 2024: नेपाळ ते छत्रपती संभाजीनगर प्रवास, मुघलांच्या भीतीने गोव्यात स्थापन झालेली श्री महालसा देवी

Subhash Velingkar: वेलिंगकरांविरुद्ध आंदोलक आक्रमक; अनेक ठिकाणी तक्रारी दाखल, अटकेसाठी हालचाली सुरु

SCROLL FOR NEXT