Delhi Blast Case: दिल्ली स्फोट प्रकरणी 'एनआयए'ची मोठी कारवाई! चार मुख्य आरोपींना अटक; 2900 किलो स्फोटकांचा साठा जप्त

NIA Delhi Blast Arrests: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात सामील असलेल्या आणखी चार मुख्य आरोपींना अटक केली.
NIA Delhi Blast Arrests
NIA Delhi Blast ArrestsDainik Gomantak
Published on
Updated on

NIA Delhi Blast Arrests: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात सामील असलेल्या आणखी चार मुख्य आरोपींना अटक केली. यासह, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची एकूण संख्या सहा झाली. अटक करण्यात आलेल्या या चारही आरोपींना पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने या चौघांनाही पुढील तपासासाठी 10 दिवसांची 'एनआयए' रिमांड सुनावली. या चारही आरोपींना 'एनआयए'ने श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर येथून, डिस्ट्रिक्ट सेशन्स जज, पटियाला हाऊस कोर्टाच्या प्रॉडक्शन ऑर्डरवर ताब्यात घेतले.

अटक केलेल्या आरोपींची ओळख

दिल्ली (Delhi) स्फोटाच्या या कटात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अटक केलेल्या चार आरोपींची नावे पुलवामा येथील डॉ. मुजम्मिल शकील गनई, अनंतनाग येथील डॉ. अदील अहमद राथर, लखनऊ येथील डॉ. शाहीन सईद आणि शोपियाँ येथील मुफ्ती इरफान अहमद वागे, अशी आहेत. या सर्व आरोपींनी त्या दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यात अनेक निष्पाप लोक मारले गेले आणि अन्य अनेक जखमी झाले.

यापूर्वीच, दिल्ली स्फोट प्रकरणात आमिर राशिद अली आणि कश्मीरचा जसीर बिलाल वानी उर्फ दानिश या दोन आरोपींना अटक झाली. या दोघांनी आत्मघाती हल्ला करणारा दहशतवादी उमर उन नबी याला मदत केली होती. आता अटक करण्यात आलेल्या चार आरोपींनीही उमरला हा दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी साहाय्य केले होते.

NIA Delhi Blast Arrests
Delhi Blast: "दिल्लीतील स्फोट आम्हीच केला..." पाकिस्तानी नेत्याची जाहीर कबुली Watch Video

6 डिसेंबरच्या मोठ्या हल्ल्याचा कट उधळला

दहशतवादी 6 डिसेंबरच्या आसपास दिल्लीत मोठा हल्ला करण्याची योजना आखत होते. याच दिवशी 1995 मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली होती, त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणात स्फोट घडवून आणण्याची त्यांची योजना होती. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सहारनपूर येथून डॉक्टर आदिलला अटक केली. श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांना धमक्या देणारे पोस्टर लावताना तो दिसला होता. आदिलच्या चौकशीनंतर डॉक्टर मुजम्मिल आणि शाहीन यांना अटक करण्यात आली. नंतर फरिदाबाद येथून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि 2900 किलो स्फोटके जप्त करण्यात आली.

NIA Delhi Blast Arrests
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

स्फोटके जप्त झाल्यामुळे दहशतवादी (Terrorist) उमर नबी घाबरला आणि त्याने नियोजित वेळेपूर्वीच हल्ला केला, ज्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. मात्र, दहशतवाद्यांना त्यांच्या मोठ्या कटात यश आले नाही. या मॉड्यूलशी संबंधित अनेक लोकांना अटक करण्यात आली असून, 'एनआयए'चा तपास सुरु आहे आणि येत्या दिवसांत आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com