

Jeewon Kim sings Vande Mataram: गोव्यातील ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (IFFI) भव्य उद्घाटन सोहळा पणजीतील जुन्या गोमेकॉ इमारतीसमोर आज (गुरूवार) सुरू होणार आहे. पणजी येथील जुन्या गोमेकॉ इमारतीसमोर यावर्षी हा सोहळा आयोजित करण्यात आला असून IFFI च्या पहिल्याच दिवशी, महोत्सवाच्या समांतर आयोजित करण्यात आलेल्या 'WAVES फिल्म बाजार' च्या उद्घाटनावेळी एक अत्यंत अभिमानास्पद क्षण अनुभवता आला.
दक्षिण कोरियाच्या नॅशनल असेंब्लीच्या सदस्य, सुश्री जेईवॉन किम यांनी 'WAVES फिल्म बाजार'च्या उद्घाटनावेळी 'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत गायले. यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री डॉ. एल मुरुगन यांनी या क्षणाचे कौतुक करताना म्हटले की, हे भारताचे जागतिक स्थान आणि आपले १५० वर्षे जुने राष्ट्रीय गीत क्षेत्र, भाषा आणि संस्कृती किती प्रभावशाली आहे, हे दर्शवते.
या महत्त्वपूर्ण उद्घाटन सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल अशोक गजपती राजू, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री डॉ. एल. मुरुगन, उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित आहेत.
यंदाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण चित्ररथांची भव्य मिरवणूक असणार आहे. गोव्याची समृद्ध संस्कृती आणि भारतीय सिनेमाचा गौरव या मिरवणुकीतून दाखवण्यात येईल. या मिरवणुकीत एकूण २३ चित्ररथ सहभागी होणार आहेत. यात गोमंतकीय कलाकारांचे आणि गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे ११ चित्ररथ असतील. उर्वरित १२ चित्ररथ राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (NFDC) असणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.