One Nation One Time Dainik Gomantak
देश

One Nation One Time: अणु घड्याळ म्हणजे काय? भारताला कशी मिळणार 'एक राष्ट्र, एक वेळ'; जाणून घ्या

One Nation One Time: समुद्राच्या खोलीपासून ते आकाशाच्या उंचीपर्यंत, भारतीय शास्त्रज्ञ सर्वत्र आपला ठसा उमटवत आहेत.

Manish Jadhav

One Nation One Time: समुद्राच्या खोलीपासून ते आकाशाच्या उंचीपर्यंत, भारतीय शास्त्रज्ञ सर्वत्र आपला ठसा उमटवत आहेत. आपण चंद्रावर पोहोचलो. मंगळावर जाण्याची तयारी करत आहोत. सूर्याला समजून घेण्यासाठी एका योजनेवर काम करत आहोत. दरम्यान, आणखी एक बातमी आली आहे, जी आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी कमाल करुन दाखवली आहे.

शास्त्रज्ञांची कमाल

दरम्यान, शास्त्रज्ञांनी करुन दाखवलेल्या कमालीमुळे भारताला आता आपली स्वतःची वेळ मिळाली आहे. होय, तुम्हाला थोडं हे विचित्र वाटू शकतं की, हा आपण टाइम काय आहे? सध्या आपल्या देशात भारतीय प्रमाणवेळ (IST) आहे, परंतु प्रत्यक्ष वेळ GPS सॅटेलाइट्सद्वारे निश्चित केली जाते, जी मिलिसेकंदांपर्यंत अचूक असते आणि ती कोऑर्डिनेटेड युनिव्हर्सल टाइम (UTC) शी जोडलेली असते. पण येत्या काही महिन्यांत ते बदलणार आहे.

'एक देश, एक वेळ' प्रणाली लागू होणार

आता नेव्हिगेशन विद इंडियन कंसटलेशन (NavIC) ला राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेशी (NPL) जोडले जाईल, जे वेळेचा संदर्भ देईल. फरीदाबाद येथील एनपीएलला नाव्हिककडून टाइम मिळेल, जो ऑप्टिक फायबर लिंक्सद्वारे अहमदाबाद, बंगळुरु, भुवनेश्वर आणि गुवाहाटी सारख्या इतर चार केंद्रांना पाठवला जाईल. या ठिकाणी अणु घड्याळे बसवली जातील. अणु घड्याळांचा वापर केल्याने डिजिटल घड्याळे, स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर दाखवला जाणारा टाइम सर्व्हिस प्रोवाइडर्सच्या जीपीएस-आधारित डेटावरुन नव्हे तर अणु घड्याळांमधून मिळवला जाईल याची खात्री होईल. लवकरच ही प्रादेशिक केंद्रे सर्व वापरकर्त्यांना वेळ उपलब्ध करुन देतील, ज्यामुळे 'एक देश, एक वेळ' प्रणाली लागू होईल.

कारगिल युद्धादरम्यान याची गरज भासली

कारगिल युद्धादरम्यान अशा वेळेच्या व्यवस्थेची गरज भासली होती. भारत परदेशी सॅटेलाइटच्या वेळेवर अवलंबून होता. परंतु सरकारने त्याचे धोरणात्मक महत्त्व समजून घेतले आणि सुमारे सात वर्षांपूर्वी या प्रकल्पावर काम सुरु केले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारत सरकारचे सचिव निधी खरे यांनी सांगितले की, 'टाइम डिसेमिनेशन प्रोजेक्ट'चे बहुतेक काम पूर्ण झाले आहे. फरीदाबाद, अहमदाबाद, बेंगळुरु आणि भुवनेश्वर येथे अणु घड्याळे बसवण्यात आली आहेत. काही महिन्यांपूर्वी NavIC लिंकची चाचणी देखील घेण्यात आली होती. त्यांचा विभाग, एनपीएल आणि इस्रो यांच्या सहकार्याने, मिलिसेकंद ते मायक्रोसेकंद अचूकतेसह आयएसटी प्रदान करेल. चारही केंद्रांवरील घड्याळे फरीदाबादच्या वेळेशी जुळवून घेतली जातील. जेणेकरुन डेटा शेअरिंगमधील वेळेतील फरक समायोजित करता येईल.

अणु घड्याळ म्हणजे काय?

अणु घड्याळ हे एक अत्यंत अचूक घड्याळ आहे जे अणूंच्या विशिष्ट रेजोनेंस वारंवारता वापरुन कार्य करते. या घड्याळांच्या अचूकतेचा अंदाज यावरुन लावता येतो की, ते सुमारे 100 दशलक्ष वर्षांत वेळ सांगण्यात फक्त एका सेकंदाचा फरक करतील.

प्रकल्पाचे फायदे

केंद्रीय माजी सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले की, यामुळे भारताचे स्वतःचे अचूक आणि विश्वासार्ह वेळ वितरण नेटवर्क स्थापित होईल, परदेशी प्रणालींवरील अवलंबित्व कमी होईल आणि राष्ट्रीय सुरक्षा वाढेल, असे टाईम्सने वृत्त दिले आहे. याचा फायदा पॉवर ग्रिड्स, टेलिकम्युनिकेशन्स, बँकिंग, संरक्षण आणि वाहतूक यासारख्या क्षेत्रांना होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT