Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

Delhi Politics:'आम्ही भगतसिंगांची औलाद तर तुम्ही...', केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

Delhi Politics News: दिल्लीत सुरु असलेले चांगले काम थांबवण्यासाठी त्यांना तुरुंगात पाठवण्याची तयारी करण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

Deputy Governor VK Saxena Vs Arvind Kejriwal: दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे प्रकरण खोटे असल्याचे म्हटले आहे. उत्पादन शुल्क विभाग सांभाळणारे मनीष सिसोदिया हे प्रामाणिक असल्याचे सांगत केजरीवाल म्हणाले की, 'दिल्लीत सुरु असलेली विकास कामे थांबवण्यासाठी त्यांना तुरुंगात पाठवण्याची तयारी करण्यात येत आहे.'

दरम्यान, आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) निमंत्रकांचे नाव न घेता भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारवर निशाणा साधत वीर सावरकर आणि भगतसिंग यांचाही उल्लेख केजरीवालांनी केला. पंजाबमधील (Punjab) विजयानंतर देशभरात आम आदमी पक्षाची लाट असून ती रोखण्याच्या प्रयत्नात चिखलफेक केली जात असल्याचेही ते म्हणाले.

तुम्ही इंग्रजांची माफी मागणाऱ्या सावरकरांचे पुत्र आहात : केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना क्लीन चिट देत म्हटले की, ''आम्ही तुरुंगाला घाबरत नाही. तुम्ही सावरकरांचे पुत्र आहात, ज्यांनी इंग्रजांची माफी मागितली होती. आम्ही भगतसिंगांची पुत्र आहोत, आम्ही भगतसिंगांना आमचे आदर्श मानतो, ज्यांनी इंग्रजांसमोर झुकण्यास नकार दिला होता. आम्ही तुरुंग आणि फाशीला घाबरत नाही. अनेकवेळा तुरुंगात गेलो आहोत." ऑनलाइन पत्रकार परिषदेत केजरीवाल पुढे म्हणाले की, 'मी सिसोदियांना 22 वर्षांपासून ओळखतो. ते "खूप प्रामाणिक" व्यक्ती आहेत.'

'सीबीआय लवकरच सिसोदिया यांना अटक करणार'

केजरीवाल पुढे म्हणाले की, 'मनीष सिसोदिया यांना तुरुंगात टाकले जाऊ शकते, असे मी आधीच सांगितले होते.' केजरीवाल पुढे असेही म्हणाले, "सीबीआय लवकरच मनीष सिसोदिया यांना एका खोट्या प्रकरणात अटक करणार आहे. मनीष हा प्रामाणिक व्यक्ती असून त्याच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. आता देशात नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. आधी कोणाला तुरुंगात पाठवायचे हे ठरवले जाते, मग त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला जातो. यात सत्याचा मागमूसही नाही.” ते शेवटी असेही म्हणाले, “हे प्रकरण कोर्टापुढे राहणार नाही. मनीष हा खूप प्रामाणिक व्यक्ती आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: वाळपईत वाहतूक कोंडी

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Virat Kohli: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

SCROLL FOR NEXT