Vande Bharat Express Dainik Gomantak
देश

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमध्ये काय आहेत सुविधा? वाचा सविस्तर

रेल्वेचे अनेकांना आकर्षण असून विमानासारख्या सुविधा या रेल्वेत देण्यात आल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Vande Bharat Express प्रवास सुलभ आणि सुखकर होण्याच्या दृष्टीने सध्या देशभरात रस्ते, रेल्वे वाहतुकीत आमूलाग्र बदल होताहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन केले.

CSMT वरुन एक वंदे भारत ट्रेन नाशिक मार्गे शिर्डीला तर दुसरी मुंबईवरुन पुणे मार्गे सोलापूरला जाणार आहे. या रेल्वेचे अनेकांना आकर्षण असून विमानासारख्या सुविधा या रेल्वेत देण्यात आल्या आहेत.

नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरला मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने आणि पुढे शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी ही वंदे भारत एक्सप्रेस महत्वाची ठरणार असून जलद वेगाने प्रवास होणार असल्याने वेळेची बचत होणार आहे.

मुंबई ते शिर्डी जवळपास 343 किलोमीटरचे अंतर आहे. यामध्ये सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी वंदे भारत ट्रेन सुटणार आहे. तर शिर्डीत ही ट्रेन दुपारी साडेकरा वाजता दाखल होणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये या आहेत सुविधा:-

  • या ट्रेनमध्ये प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र मोबाईल चार्जिंगची सुविधा

  • जेवण किंवा नाश्ता करण्यासाठी फोल्डेबल कॉम्पॅक्ट टेबल

  • लोणावळा घाटासह विविध दृश्य पाहण्यासाठी रोटेट चेअरही आहे

  • मोबाईल किंवा कॅमेरात विहंगम दृश्य टिपण्याचा आनंद

  • मुंबईहून सोलापूरला ही ट्रेन केवळ साडेसहा तासात पोहोचते

  • या ट्रेनमध्ये चेअर कार आणि एक्झिक्यूटिव्ह कार अशा दोन प्रकारच्या बोगी आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT