Arpita Mukherjee  Dainik Gomantak
देश

Bengal SSC Scam: अर्पिता मुखर्जींच्या आणखी एका ठिकाणावर ईडीची धाड !

West Bengal News: पश्चिम बंगालमध्ये शाळा भरती घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय एजन्सी ईडीची कारवाई सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

West Bengal SSC Scam: पश्चिम बंगालमध्ये शाळा भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई सुरु आहे. बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या बेलघरिया, कोलकाता येथील फ्लॅटवर छापा टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे, नोटा मोजण्यासाठी पाच बँक अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. यासोबतच कॅश मोजण्यासाठी मोजणी यंत्रेही मागवण्यात आली. 15 कोटींहून अधिक रोकड सापडल्याची माहिती सूत्रांनी रात्री 9.30 च्या सुमारास दिली. अजूनही नोटांची मोजणी सुरु आहे.

दरम्यान, तीन किलो सोने, चांदीची नाणी आणि मालमत्तेची कागदपत्रेही जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अर्पिता मुखर्जी सध्या ईडी (ED) कोठडीत आहेत. प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांना नुकतीच अटक करण्यात आली. 22 जुलै रोजी ईडीने मुखर्जी यांच्या आणखी एका ठिकाणाहून 21 कोटींची रोकड जप्त केली. त्यानंतर पार्थ चॅटर्जींनाही दीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली.

डायरीतून गुपिते उघड होतील

यापूर्वी अर्पिता मुखर्जीकडून दोन डायऱ्या जप्त करण्यात आल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील एका डायरीमध्ये अर्पिता मुखर्जी यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेल्या रोख रकमेची माहिती आहे. अर्पिता मुखर्जी यांच्याकडे ही रोकड कुठून आली हे ईडीला जाणून घ्यायचे आहे. या डायरीमध्ये विविध बँकांमध्ये (Bank) अनेक वेळा रोख रक्कम जमा केल्याचा तपशील आहे. ही रोकड लाखात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

SCROLL FOR NEXT