West Bengal Crime Dainik Gomantak
देश

West Bengal Crime: पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये विनयभंगाची घटना; नर्सला अयोग्य स्पर्श करणारा आरोपी गजाआड!

West Bengal Crime: देशात सध्या पश्चिम बंगालमधील ज्युनियर महिला डॉक्टरवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरण गाजत आहे.

Manish Jadhav

देशात सध्या पश्चिम बंगालमधील ज्युनियर महिला डॉक्टरवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरण गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम बंगालमधीलच बीरभूम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीरभूम जिल्ह्यातील इलमबाजार आरोग्य केंद्रात ऑन ड्यूटी नर्सचा विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. तीव्र तापामुळे आरोग्य केंद्रात स्ट्रेचरवर आणलेल्या व्यक्तीला ही नर्स सलाईनचे ड्रिप देत असताना ही घटना घडली. नर्सने आरोप केला की, जेव्हा ती आरोग्य केंद्रात स्ट्रेचरवर आणलेल्या आजारी व्यक्तीला ड्रिप देण्यासाठी गेली तेव्हा त्याने तिचा विनयभंग केला.

दरम्यान, या घटनेने इलामबाजार येथील आरोग्य केंद्रात तणावाचे वातावरण आहे. शनिवारी (31 ऑगस्ट) रात्री रुग्णालय प्रशासनाने या घटनेविषयी पोलिसांना कळवले आले असता त्यांनी तात्काळ घटनास्थळ पोहोचून आरोपी रुग्णाला ताब्यात घेतले. या घटनेबाबत इलमबाजार पोलीस ठाण्यात लेखी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनीही तपास सुरु केला आहे.

अयोग्यरित्या स्पर्श केला

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री एका तरुणाला आजारपणामुळे इलामबाजार गट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले होते. त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीयही होते. त्याला इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्याने पीडिता तरुणाला ड्रिप देण्यासाठी गेली तेव्हा ही विनयभंगाची घटना घडली.

पीडित नर्सने सांगितले की, ''रात्रीच्या शिफ्टमध्ये एका तरुणाला ताप आल्यामुळे आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. जेव्हा मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला ड्रिप देत होते तेव्हा त्याने माझ्याशी गैरवर्तन केले. आरोपी व्यक्तीने मला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि माझ्यासोबत अपशब्दांचा प्रयोग केला.''

शनिवारी रात्री आरोग्य केंद्रात ड्यूटीवर असलेले डॉ. मसीदुल हसन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ''रात्री साडेआठच्या सुमारास एक रुग्ण एस. अब्बास उद्दीन याला तापामुळे आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र येताच तो गैरवर्तन करु लागला. काही मेडिकल टेस्टनंतर आम्ही त्याला काही इंजेक्शन्स आणि IV फ्लूइड देण्याचा सल्ला दिला. नर्स जेव्हा ते देण्यासाठी त्याच्याजवळ गेली तेव्हा त्याने तिला शिवीगाळ करत अयोग्य स्पर्श केला. याप्रकरणी आम्ही पोलिसांनी माहिती दिली आहे. मात्र याप्रकरणी कारवाई न झाल्यास आम्ही काम बंद करु.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT