West Bengal Weather
West Bengal Weather  Twitter
देश

पश्चिम बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने केला कहर

दैनिक गोमन्तक

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पावसामुळे झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. शनिवारी संध्याकाळी कोलकातासह बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राम येथे वीज पडून एक महिला आणि तिचा मुलगा मरण पावला. खरगपूरमध्ये बांबूचे गेट कोसळून एकाचा मृत्यू झाला. वादळामुळे अनेक भागात झाडे उन्मळून पडली. पावसानंतर नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पश्चिम बंगालमध्ये अशा परिस्थितीला काळ बैसाखी म्हणतात. बांगलादेशातही तीव्र वादळाला काळ बैसाखी म्हणतात. (West Bengal Weather Updates)

नादिया जिल्ह्यात वादळामुळे झाडाची फांदी कोसळल्याने रवींद्रनाथ प्रामाणिक (६२) नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. याशिवाय वादळाचा तडाखा बसल्याने आणखी एक जण जखमी झाला आहे. दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील बालूरघाटमध्ये वादळामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथे, पूर्व वर्धमान जिल्ह्यातील कटवा-अजीमगंज शाखेत, रेल्वे ट्रॅकच्या वरच्या ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याने रेल्वे सेवा प्रभावित झाली.

मात्र, राजधानी कोलकातामध्ये असा पाऊस झालेला नाही. कोलकाता आणि त्याच्या लगतच्या हावडा, उत्तर 24 परगणा, दक्षिण 24 परगणा आणि हुगळी या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस झाला आहे. शनिवारीही विविध जिल्ह्यांच्या आकाशात काळे ढग कायम होते. पुरुलिया, बांकुडा, बीरभूम, मुर्शिदाबाद, दुर्गापूर आणि वर्धमान जिल्ह्यातही जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. अलिपूर हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यात पुढील काही दिवस विखुरलेला पाऊस सुरूच राहणार असून, उष्णतेमध्ये थोडीशी घट होईल.

राज्यात पुन्हा चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चक्रीवादळ येण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सध्या दक्षिण बंगालवर नैऋत्येचे वारे वाहत आहेत, ज्यामुळे उत्तर प्रदेश ते पश्चिम बंगालपर्यंत गंगेच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्याच्या प्रभावामुळे पुढील 4 ते 5 दिवस राज्यात हलका आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोलकाता आणि लगतच्या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

Supreme Court: 11,600 झाडे तोडण्याविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयात; केंद्र अन् राज्य सरकारकडे मागितले उत्तर

Goa Today's Live Update: थिवीत रविवारी तीन तास वीज पुरवठा विस्कळीत राहणार

SCROLL FOR NEXT