Weather Update Dainik Gomantak
देश

Weather Update: 17 राज्यांमध्ये हाय-अलर्ट! वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, केरळमध्ये 'या' दिवशी होणार मान्सूनचे आगमन

Kerala Monsoon Arrival Date 2026: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, सध्या देशात एकाच वेळी दोन पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहेत.

Sameer Amunekar

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, सध्या देशात एकाच वेळी दोन पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहेत. यातील एक विक्षोभ उत्तर पाकिस्तान आणि जम्मू क्षेत्रावर चक्रीवादळाच्या (Cyclonic Circulation) स्वरूपात आहे, तर पूर्व मध्य प्रदेश ते उत्तर बांगलादेशपर्यंत आणखी एक हवेचा दाब निर्माण झाला आहे.

या अनुकूल परिस्थितीमुळे अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. देशातील १७ राज्यांमध्ये पुढील काही दिवसांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये धुळीचे वादळ आणि ८० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे नागरिकांची तारांबळ उडवू शकतात.

मान्सूनच्या आगमनाचे नवीन अपडेट

हवामान प्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे, यंदा केरळमध्ये मान्सून २६ मे पर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी २४ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. केरळमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात मान्सून उत्तर-पश्चिम भारतात प्रवेश करेल आणि सप्टेंबरपर्यंत त्याचा परतीचा प्रवास सुरू होईल.

मात्र, यंदा 'एल निनो'च्या (El Nino) प्रभावामुळे चिंतेचे वातावरण आहे. या वर्षभरात सरासरीपेक्षा ७० टक्क्यांहून कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, कडक उन्हाळ्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

दिल्लीत उन्हाचा कडाका, पण पावसाचीही शक्यता

राजधानी दिल्ली सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. कमाल तापमानात मोठी वाढ झाली असली, तरी अंशतः ढगाळ वातावरणामुळे दुपारी किंवा संध्याकाळी हलक्या पावसाची शक्यता आहे. दिल्लीत ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात, ज्यामुळे तात्पुरता दिलासा मिळेल. पुढील दोन दिवसांत किमान तापमानात २-३ अंशांची घसरण होऊन नंतर पुन्हा त्यात वाढ होईल, असा अंदाज आहे.

उत्तर आणि मध्य भारतात तीव्र उष्णतेची लाट

एकीकडे पावसाचा इशारा असला, तरी १६ ते २१ मे दरम्यान पश्चिम राजस्थान आणि उत्तर प्रदेशात तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, चंदिगढ आणि दिल्लीमध्ये १७ ते २१ मे दरम्यान कडक ऊन पडेल. महाराष्ट्राचा विचार केला तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि गोव्यात हवामान अत्यंत दमट आणि उष्ण राहणार असून, रात्रीच्या वेळीही नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागेल.

८० किमी वेगाने धुळीचे वादळ

  • उत्तर-पश्चिम भारत: जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील. विशेषतः काही भागांत ७० ते ८० किमी प्रतितास वेगाने भयंकर धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे.

  • पूर्व आणि पूर्वोत्तर भारत: आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये २१ मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. येथे वाऱ्याचा वेग ५० ते ७० किमी प्रतितास असू शकतो.

  • मध्य आणि पश्चिम भारत: पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, तसेच कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची हजेरी लागेल.

  • दक्षिण भारत: केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि लक्षद्वीपच्या काही भागांत मुसळधार पावसासह गारपिटीची (Olavrushti) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT