India Weather Forecast : मागील काही दिवसांपासून देशभरात अनेक ठिकाणी पावसाने आपली हजेरी लावली आहे. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे. दुसरीकडे, हवामानाचा विचार केल्यास, हरियाणा आणि लगतच्या भागावर चक्री वारे वाहत आहेत. त्यामुळे राजस्थानसह देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. झारखंडच्या काही, भागातही वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव दिसून येतो. चला जाणून घेऊया आजचे हवामान कसे असेल.
(India Weather Forecast )
उत्तर प्रदेशातील राजधानी लखनऊसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर 12वीपर्यंतच्या सर्व सरकारी आणि निमसरकारी शाळा आणि उच्च शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. झारखंडच्या काही भागात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव दिसून येत आहे. दिल्लीत पावसामुळे तापमानाचा पारा घसरला आहे.
या राज्यांमध्ये पावसाची शक्यता
आज म्हणजेच बुधवारी देशाच्या अनेक भागात पाऊस पडू शकतो. हवामानानुसार, पुढील 24 तासांत अरुणाचल प्रदेशात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. याशिवाय सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.