Viral Video
Viral Video  Twitter
देश

Watch Video: यांची भांडणे कोणीतरी सोडवा, पैज लावून सांगतो असे भांडण तुम्ही यापूर्वी पाहिले नसेल

गोमन्तक डिजिटल टीम

नेटवर दररोज हाजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यात अनेक व्हिडिओ हे फनी असतात. अलिकडे अनेक कलाकार देखील काही व्यंग करून लोकांना हासविण्याचे काम करतात. शिवाय दररोजच्या विविध घटना देखील आजकाल लगेच व्हायरल होतात आणि लोकांची करमणूक होते. प्रत्येकाच्या हातात आजकाल मोबाईल आल्याने असे व्हिडिओ पाहायला मिळतात.

दरम्यान, एक वेगळा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून, असा व्हिडिओ तुम्ही यापूर्वी पाहिलेला नसेल.

काय आहे व्हिडिओ?

एक व्हिडिओत कोंबडीचे एक पिल्लू आणि श्वानाचे एक पिल्लू हे दोघे खेळताना दिसत आहेत. मात्र कोंबडीचे पिल्लू अतिशय आक्रमक पद्धतीने श्वानाच्या पिल्लावर हल्ला करताना दिसत असून, श्वानाचे पिल्लू तिथून पळ काढताना दिसत आहे.

कोंबडीचे पिल्लू मात्र, लहान श्वानाचा पिच्छा काही सोडत नाही. शेजारीच असेलल्या बाईकच्या भोवती हे दोघे दोन ते तीन फेऱ्या मारतात. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

कोंबडीचे पिल्लू काहीकेल्या श्वानाच्या पिल्लाचा पिच्छा सोडत नाही. शेजारीच श्वानाच्या पिल्लाची आई बसलेली दिसत आहे. कोंबडीचे पिल्लू त्याची देखील तमा न बाळगता तिच्या पाठीवर चढून पिल्लावर दादागिरी करत थेट अंगावर उडू मारून पुन्हा भांडताना दिसत आहे.

कोंबडीच्या पिल्लापासून आपला बचाव करत हे पिल्लू शेवटी पळ काढताना दिसत आहे. मात्र, तिकडेही हे कोंबडीचे पिल्लू त्याचा पाठलाग करताना दिसत आहे.

नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर फार गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणीतरी यांची भांडणे सोडवा अशी एक प्रतिक्रिया नेटकऱ्याने दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist Rush At Morjim Beach: मोरजी समुद्रकिनाऱ्यावर तोबा गर्दी; पर्यटकांसह स्थानिकांचीही वळली पावले

Monsoon Health Care: आला पावसाळा, काळजी घ्या, आरोग्य सांभाळा! मलेरिया डेंग्यूबाबत जागृती आवश्‍यक

Tiswadi News : तिसवाडीत मध्यरात्री दीड तास बत्तीगुल; ११० केव्ही केबल तुटली

Goa Cyber Crime: नोकरीच्या बहाण्याने विनयभंग; संशयिताला बंगळुरूमध्ये अटक

Goa Money Laundering Case: वेश्या व्यवसायातील 21 कोटी हवालाद्वारे परदेशात; मनी लॉंड्रिंग प्रकरणाचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT