Andhra Pradesh CM Reddy dainik gomantak
देश

Andhra Pradesh: CM जगन रेड्डी यांची मोठी घोषणा, आंध्र प्रदेशची नवी राजधानी असणार विशाखापट्टणम

Andhra Pradesh CM Reddy: आंध्र प्रदेशच्या राजधानीत बदल झाला आहे. आता विशाखापट्टणम ही दक्षिण भारतीय राज्याची नवी राजधानी म्हणून ओळखली जाईल.

दैनिक गोमन्तक

Andhra Pradesh CM Reddy: आंध्र प्रदेशच्या राजधानीत बदल झाला आहे. आता विशाखापट्टणम ही दक्षिण भारतीय राज्याची नवी राजधानी म्हणून ओळखली जाईल. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी मंगळवारी ही घोषणा केली. यासोबतच त्यांनी नव्या राजधानीत ग्लोबल इन्व्हेस्टर समिट आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

सीएम रेड्डी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, ते म्हणाले की, 'मी तुम्हाला विशाखापट्टणमला आमंत्रित करतो, जी येत्या काही दिवसांत आमची राजधानी बनणार आहे. येत्या काही महिन्यांत मी विशाखापट्टणमलाही (Visakhapatnam) शिफ्ट होत आहे. आम्ही 3 आणि 4 मार्चला विशाखापट्टणम येथे या शिखर परिषदेचे आयोजन करणार आहोत…'

विशेष म्हणजे, आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) सरकारने तेलंगणापासून वेगळे झाल्यानंतर 9 वर्षानंतर हा निर्णय घेतला आहे. 23 एप्रिल 2015 रोजी अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी घोषित करण्यात आली. त्यानंतर 2020 मध्ये राज्याच्या तीन राजधानींचे नियोजन करण्यात आले. यामध्ये अमरावती, विशाखापट्टणम आणि कुर्नूल या शहरांचा समावेश आहे. मात्र, नंतर ती मागे घेण्यात आली आणि अमरावती ही राजधानी राहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT