Virat Kohli Century Dainik Gomantak
देश

Virat Kohli Century: पुन्हा एकदा 'विराट'! 83 व्या शतकाच्या सेलिब्रेशनमध्ये मोठा ट्विस्ट; फॅनचा मैदानात घुसून 'साष्टांग दंडवत' Watch Video

Virat Kohli Fan Video: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर खेळला जात आहे.

Sameer Amunekar

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, माजी भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले आहे.

कोहलीचे हे ८३ वे एकदिवसीय शतक आहे. हे वादळी शतक २८० दिवसांच्या अंतरानंतर आले आहे. विराट कोहली रांचीमध्ये शानदार फलंदाजी करत आहे, षटकार आणि चौकार मारत आहे.

या सामन्यात एक हृदयाला भिडणारी घटना घडली. कोहली शतक साजरा करत असतानाच एका उत्साही चाहत्याने सुरक्षेची कडी भेदून थेट मैदानात प्रवेश केला. कोहलीसमोर पोहोचताच त्या चाहत्याने त्याला साष्टांग नमस्कार केला. या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली आणि शतक झळकावले. "रन मशीन" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोहलीने रांचीमध्ये फक्त १०२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने १००.९८ च्या स्ट्राईक रेटसह सात चौकार आणि पाच षटकार मारले. हे विराटचे ५२ वे एकदिवसीय शतक आणि ८३ वे आंतरराष्ट्रीय शतक होते.

रांची येथे विराट कोहलीचे शतक हे त्याचे ८३ वे आंतरराष्ट्रीय शतक होते. त्याचे मागील शतक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: बनावट गिऱ्हाईक बनून पोलीस पोहोचले अन्... गोव्यात मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची केली सुटका; दलालांचे धाबे दणाणले

अपहरण, जबरदस्ती अन् पाशवी अत्याचार! आर्केस्ट्रात काम करणाऱ्या तरुणीची 6 नराधमांनी लुटली अब्रु; पूर्णियाात ओलांडली क्रौर्याची सीमा

बर्च नाईटक्लब अग्नितांडवावरून विधानसभेत गदारोळ; राज्यपालांच्या अभिभाषणावेळी हौदात गेलेल्या विरोधी पक्षातील आमदारांना काढले बाहेर

Pakistan Nuclear Policy: 'पाकिस्तानचा अणुबॉम्ब फक्त भारतासाठीच!' अण्वस्त्र धोरणावरुन नजम सेठींचा खळबळजनक दावा; पाकिस्तानी पत्रकारानं उघडलं देशाचं गुपित

VIDEO: रिझवानची लाजच काढली! नॉट आऊट असूनही मैदानाबाहेर जावं लागलं! व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT