Taj Mahal Home Dainik Gomantak
देश

Taj Mahal Home: बायकोसाठी काय पण! पतीनं पत्नीसाठी बांधला 4BHK 'ताजमहाल', VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल

Madhya Pradesh Taj Mahal: सध्या सोशल मीडियावर ताजमहालसारख्या घराचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो उत्तर प्रदेशातील आग्रा येथील नाही तर मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील आहे.

Sameer Amunekar

Indian Businessman Builds Taj Mahal

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात ताजमहालसारखे दिसणारे एक आलिशान घर दिसून येत आहे. विशेष म्हणजे, हे कुठलेही हॉटेल किंवा पर्यटनस्थळ नाही, तर एका प्रेमळ जोडप्याचं खाजगी निवासस्थान आहे. हे 4BHK घर मध्य प्रदेशातील बुरहानपूर शहरात स्थित असून, व्यापारी आनंद प्रकाश चौकसे यांनी आपल्या पत्नीच्या प्रेमात हे घर बांधलं आहे.

या व्हिडिओमध्ये दिसणारे हे घर खऱ्या ताजमहालसारखं दिसत आहे. घराभोवतीची सुंदर कोरीवकाम, भव्य घुमट, कमानीदार दरवाजे आणि संपूर्ण रचना पाहणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

या व्हिडिओमध्ये इंस्टाग्राम युजर प्रियम सारस्वत या जोडप्याशी संवाद साधताना दिसत आहे. ते विचारतात, “हे खरंच तुमचं घर आहे का? आणि हे ताजमहालसारखं आहे का?” त्यावर हसत हसत दोघंही “होय” असं उत्तर देतात. यानंतर जेव्हा विचारण्यात येतं की हे घर पत्नीला समर्पित आहे का, तेव्हा चौकसे उत्तर देतात, “१००% माझ्या पत्नीसाठी.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, हे सुंदर घर इंदूरजवळ आहे आणि प्रेम पसरवण्याच्या उद्देशाने बांधलं गेलं आहे. सर्वात खास बाब म्हणजे हे घर एका शाळेच्या परिसरात उभारलं आहे, जी चौकसे यांनी सुरू केली आहे.

हा व्हिडिओ आतापर्यंत ५.९ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला असून, नेटिझन्सकडून भरभरून प्रतिक्रियाही येत आहेत. काही युजर्सनी याला “संगमरवरात कोरलेली कविता” म्हटलं आहे, तर काहींनी लिहिलंय, “हे फक्त घर नाही, हे प्रेमाचं जिवंत प्रतीक आहे.” अनेकांनी या कल्पनेला प्रेरणादायी ठरवत लिहिलं – “प्रेम शब्दांनी नाही, वारशाने व्यक्त करा!”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT