Viral Vedio Dainik Gomantak
देश

Viral Video: ट्रान्सफॉर्मर उतरवणाऱ्या 'भाई'चा जुगाड व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली मजा; म्हणाले, 'याला तर भारतरत्न द्या...'

Social Media Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ अपलोड होतात. पण या व्हिडिओपैकी तेच व्हिडिओ व्हायरल होतात जे अतरंगी आणि अनोखे असतात.

Manish Jadhav

Social Media Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ अपलोड होतात. पण या व्हिडिओपैकी तेच व्हिडिओ व्हायरल होतात जे अतरंगी आणि अनोखे असतात. यातही जुगाडाचे व्हिडिओ असतील तर लोक असे व्हिडिओ पाहणे जास्त पसंद करतात. सध्या असाच एक अतरंगी जुगाडू असलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

जुगाडू व्हिडिओ व्हायरल

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) एका ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या मदतीने विजेचा ट्रान्सफॉर्मर (Transformer) खाली उतरवण्याचे किंवा त्याला हलवण्याचे काम सुरु असल्याचे दिसत आहे. ट्रान्सफॉर्मर उचलण्यासाठी त्यावर एक मोठी साखळी (Chain) आणि हुक (Hook) लावलेला आहे. या कामादरम्यान सुरक्षिततेसाठी किंवा आधार देण्यासाठी एका दोरीचा (Rope) वापर केला गेला आहे. ही दोरी ट्रान्सफॉर्मर उचलणाऱ्या पोलवरुन खाली येत आहे. ही दोरी बांधणाऱ्या व्यक्तीने जे 'अतरंगी' डोके लावले आहे, त्यामुळेच हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याने ती जाड दोरी चक्क शेतात उगवलेल्या एका लहान रोपाला (Crop Plant) बांधली.

ट्रान्सफॉर्मरला आधार देण्यासाठी इतक्या हलक्या आणि कमकुवत रोपाचा आधार घेणे, हे पाहून अनेकांना हसू आवरले नाही.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

दोरी बांधणाऱ्या व्यक्तीचा हा अतरंगी जुगाड सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय बनला. हा व्हिडिओ mahavir_vaishnav_photography नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओवर 'रस्सी बांधने वाले भाई को 21 तोपों की सलामी', असे उपरोधिक कॅप्शन लिहिले.

हा व्हिडिओ आतापर्यंत 10 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला. विशेष म्हणजे, नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या.

  • एका युजरने कमेंट केली, "या दोरी बांधणाऱ्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा."

  • दुसऱ्या एका युजरने 'बुडत्याला काडीचा आधार' या म्हणीचा संदर्भ देत लिहिले, "बुडत्याला काडीचा आधार, नेहमी ऐकले होते, आज बघितले देखील."

  • अनेक यूजर्संनी हसण्याचे इमोजी पोस्ट करत हा व्हिडिओ अतिशय मनोरंजक असल्याचे म्हटले.

अशा प्रकारे, थोडीही सुरक्षितता न पाहता केलेला हा ग्रामीण 'जुगाड' सध्या सोशल मीडियावर लोकांचे मनोरंजन करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंड्यात निवडणुकीचे पडघम! दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कोणाची लागणार लॉटरी?

Birch By Romeo Lane Case: 'बर्च बाय रोमियो लेन' प्रकरणात ॲड. रोहित ब्रास-डिसांचा राजीनामा; न्यायाधीशांवर केले गंभीर आरोप

Goa Govrnment Jobs: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! विधानसभा निवडणुकीआधी नोकऱ्यांचा पाऊस; मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक

सॅम्युअल मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिस अधीक्षकांनी नोंदवले ब्रागांझा कुटुंबीयांचे जबाव, पोलिसांच्या कारवाईवर आमदार फेरेरांचे आक्षेप

Mala Lake Fish Death: मळा तलावातील माशांचा रहस्यमय मृत्यू! उच्च न्यायालयाच्या तडाख्यानंतर 32 घरांना बसला सांडपाणी जोडणीचा वेढा

SCROLL FOR NEXT