Shocking Video: सोशल मीडिया हे आजच्या काळात मनोरंजनाचे मोठे व्यासपीठ बनले आहे. दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजारो व्हिडिओ अपलोड केले जातात, त्यापैकी काही व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल होतात. गंमतीदार, चकित करणारे, तर कधी थरारक व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. सध्या असाच एक अतरंगी व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्याला पाहून तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) एका नदीच्या किंवा नाल्याच्या किनाऱ्यावर हा थरार सुरु असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा खोल पाण्यातून एका कपड्याला किंवा दोरीला पकडून वर येण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी, वरती एक मुलगी उभी आहे, जिने त्या कपड्याचा दुसरा टोक पकडला आहे. व्हिडिओ पाहणाऱ्याला सुरुवातीला असे वाटते की ती मुलगी त्या मुलाला पाण्यातून बाहेर येण्यास मदत करत आहे.
तो मोठ्या प्रयत्नांनी आणि संघर्षाने वर पोहोचतो. मात्र, पुढील क्षण धक्कादायक असतो. तो मुलगा पूर्णपणे वर येताच ती मुलगी त्याला अचानक लाथ मारते आणि तो पुन्हा पाण्यात पडतो. ही अनपेक्षित घटना पाहून कोणताही व्यक्ती हैराण होईल आणि त्याला हसू देखील आवरता येणार नाही.
दरम्यान, या व्हिडिओमध्ये नेमके काय घडले, याचा अर्थ कोणालाही लागलेला नाही, पण याच अनपेक्षित आणि अतरंगी कृत्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. व्हिडिओ 'एक्स'वर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @OGitala नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओला कॅप्शन देताना, ‘मरता क्या नहीं करता’ असे विनोदाने लिहिले, जे व्यक्तीच्या जगण्यासाठीच्या धडपडीवर एक उपरोधिक भाष्य आहे.
या व्हिडिओला आतापर्यंत 46 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. व्हिडिओवरील कमेंट्सही तितक्याच मजेदार आहेत. अनेक यूजर्संनी हा व्हिडिओ शेअर करुन आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली, ‘हे नेक्स्ट लेव्हल नाही, तर लास्ट लेव्हल आहे’. तर अनेक यूजर्संनी हसण्याचे इमोजी पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकंदरीत, हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओने पुन्हा एकदा हे सिद्ध केले की, सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा अंदाज लावणे फारच अवघड आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.