Viral Video Dainik Gomntak
देश

Viral Video: 'माझ्या मुलीला हात लावायची हिम्मत कशी झाली...', चिडलेल्या बापाचा विमानात राडा

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक प्रवासी दुसऱ्या प्रवाशाशी भांडताना दिसत आहे.

Manish Jadhav

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक प्रवासी दुसऱ्या प्रवाशाशी भांडताना दिसत आहे. ही घटना 25 जून रोजी घडली होती, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

खरे तर, मुंबईहून डेहराडूनला जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटमध्ये एका प्रवाशाचा मुलीला स्पर्श झाला, त्यानंतर तिचे वडील चांगलेच संतापले. ते ओरडत म्हणाले- "माझ्या मुलीला हात लावण्याची हिम्मत कशी झाली".

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, मुलीचे वडील आपल्या सीटवरुन प्रवाशावर ओरडताना दिसत आहेत.

नेमकं प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइटमध्ये एक कुटुंब प्रवास करत होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगीही होती. मुलीने पुढच्या सीटला पायाने ढकलले, त्यानंतर समोर बसलेली व्यक्ती मुलीला म्हणाली, तुला काही शिष्टाचार नाही का? त्यानंतर मुलगी (Girl) आरडाओरडा करु लागते.

इकडे मुलीचे आई-वडीलही त्या प्रवाशाला रागवत त्याच्यावर ओरडतात. वडिलांनी समोरच्या व्यक्तीवर आरडाओरड करुन मुलीला स्पर्श केल्याचा आरोप केला. त्यांच्यासोबत उभी असलेली तिची आईही त्याच्याशी वाद घालताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहा

त्याचवेळी, एअर होस्टेस दोन्ही प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. प्रकरण वाढत असल्याचे पाहून एका एअर होस्टेसने फ्लाइटच्या कॅप्टनला फोन करण्यास सांगितले.

त्यानंतर विस्ताराने या घटनेला संबोधित करताना एक निवेदन जारी करुन म्हटले आहे की, “25 जून 2023 रोजी मुंबईहून (Mumbai) डेहराडूनला जाणाऱ्या विस्तारा फ्लाइट UK 852 मधील दोन प्रवाशांमध्ये वाद झाला होता. जो विस्ताराच्या केबिन क्रूने शांतपणे सोडवला. त्यानंतर बाकीचा प्रवास शांततेत पार पडला.''

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

हा व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर @gharkekalesh नावाच्या पेजने शेअर केला आहे. ज्याचे कॅप्शन लिहिले आहे - विस्तारा फ्लाइटमध्ये दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख लोकांनी पाहिला आहे. याआधीही फ्लाइटचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात लोक एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT